Tuesday, February 11, 2025

/

शर्मन जोशी अभिनित नाटक *राजू राजा राम और मै* बेळगावात

 belgaum

प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता आणि नाट्य कलाकार तसेच थ्री इडियट फेम शर्मन जोशी अभिनित राजू राजा राम और मै या हिंदी नाटकाचा प्रयोग बेळगाव मध्ये होणार आहे.
या प्रयोगाद्वारे जमणारा निधी बेळगाव रॉयल्स राऊंड टेबल २०५ या संस्थेतर्फे सामाजिक उपक्रमासाठी वापरला जाणार आहे.

SHarman joshi
ही संस्था बेळवट्टी या गावातील माध्यमिक शाळेला ३ वर्गखोल्या बांधून देत आहे, यासाठी एकूण खर्च २५ लाख येणार असून वर्गखोल्या बरोबरच मुलींसाठी स्वच्छतागृहेही बांधली जातील.
या संस्थेने यापूर्वी कडोली येथील शिवाजी हायस्कुल आणि न्यु वन्टमुरी येथील ग्रामीण निवासी शाळेला एकूण ६ वर्गखोल्या बांधून दिल्या आहेत.

या नाटकाचा प्रयोग २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता व्हिटीयूच्या सभागृहात होणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शीत या नाटकात शर्मन जोशी चार भूमिका करणार आहे. मराठी नाटक सहिरे सही चा हा हिंदी रिमेक असून हास्याची मेजवानी हेच समीकरण आहे.
या नाटकाच्या देणगी प्रवेशिकासाठी दीपक रायबागी 93530 03030 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.