Friday, December 27, 2024

/

 शिवसेना कर्नाटकात  निवडणूक लढणार

 belgaum

Shiv senaकर्नाटकात श्रीराम सेनेच्या मदतीने शिवसेना कर्नाटक विधानसभेची निवडणूक लंढणार आहे. हुबळी येथे आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करण्यात आली आहे.

धनुष्य बाण या शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर ही निवडणूक लढवली जाणार आहे. याबद्दलची चर्चा पूर्ण झाली असून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण यापद्धतीने काम करणाऱ्या उमेदवारांची निवड स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत.

कर्नाटकात १० ते १५ वर्षांपासून शिवसेना काम करीत आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवण्यात येणार आहे. इतर पक्षांपेक्षा हिंदुत्वावर भविष्यात शिवसेनाच जास्त आक्रमक असणार आहे.

गुलबर्गा, कारवार, बिदर, बेळगाव येथे तालुका पंचायत, ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकात शिवसेनेने यश मिळवले आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात निवडणूक लढविली जाणार असून प्रत्येक मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार राहील.

या परिषदेत सिद्धलिंग स्वामीजी, कर्नाटक श सम्पर्क प्रमुख अरविंद नागनूरी, राजू भवानी, कुमार हकारी, मधुकर मुद्राडी, शिवकूमार रेड्डी, महालिंगप्पा गुंजगावी, आनंद शेट्टी अडयार, हेमंत जानेकर यांचा समावेश होता.

अश्या आहेत जबाबदाऱ्या

राजू भवानी यांच्यावर गुलबर्गा बिदर रायचूर यादगिरी,कुमार हकारी यांच्याकडे हुबळी धारवाड,हावेरी कारवार कोप्पळ गदग बेळळारी ,महानिंगपा गुंजगावी विजापूर बागलकोट,मंगळूर उडुपी आणि कारवार हे जिल्हे आनंद शेट्टी,शिवकुमार रेड्डी बंगळुरू मैसूर सह दक्षिण कर्नाटकातील 8 जिल्हे, महेश कोप्प यांच्या कडे चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, दावनगेरे शिमोगा तर हेमंत हसन आणि कोडगू जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.