॥ कार्यात सफलता देणारे वर्ष॥
कुंभ राशी काळपुरुषाच्या कुंडलीतील अकरावी रास असून पश्चिमीा तिचे वर्चस्व असते. या राशीचे लोक कुशाग्र बुध्दीमत्तेचे विचारशील, उदार, थोड्या गंभीर, सहनशील वृत्ती असणार्या धार्मिक व धैर्यवान अशा असतात. याचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे यांना आपल्या बौध्दीक क्षमतेवर खूप विश्वास असतो. तसेच गुढविद्या गुप्तविद्या रहस्तमय गोष्टी शोधण्याची त्यांना विशेष आवड असते. या राशीचे लोक आपला विचार दुसर्यांवर लावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे समाजात त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण होतो. याच्याकडे चांगल्या प्रकारची ग्रहण शक्ती असते. व्यवहाराला पारदर्शक असतात.
या राशीचे लोक विशेष करुन आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा कंपन्या यामध्ये काम करणारे तसेच संशोधन क्षेत्रे ज्यात विज्ञान अंतराळातील शोध तसेच, हवामान खाते, प्लॅस्टीकच्या वस्तुचा व्यापार त्यासंबंधीचे व्यवसाय यात विशेष दिसून येतात.
या लोकांना विशेष करुन वातविकार सर्दीचे विकार म्हणजे नाक,कान, घसा या संदर्भाचे आजार विशेष असतात. मानसिक अस्वच्छता, पायासंबंधीचे विकार होवू शकतात.
जानेवारी-फेब्रुवारी : गतवर्षी पेक्षा हे वर्ष आपणासाठी श्रेष्ठ ठरणार आहे. जी कार्य प्रलंबीत होती ती कार्ये यावर्षी पूर्ण होतील. काही अस्मरणीय घटना या वर्षी घडतील. थांबलेला पैसा किंवा व्यवसाय यांना गती मिळेल. या वर्षी गोचटीने शनी आपला लाभात असून तो आपल्याला फलप्रद राहील. राशी स्वामी असल्याने तो लाभातून आपल्याला चांगले फळ देईल. गोपटी गुरु आपल्या भाग्यस्थानात ऑक्टोबरपर्यंत राहील. त्यामुळे तो यावर्षी आपणास धार्मिक कार्यात यश देईल. या काळात आपण धार्मिक स्थळांना भेटी द्याल किंवा त्यासंदर्भात प्रवास कराल. आरोग्याच्या बाबतीत हा महिना तसा अनुकूल असा राहील तर पूर्वीपासून एखाद्या रोगापासून ग्रस्त असाल तर तो रोगनियंत्रक करण्यास हा काळ चांगला राहील. या महिन्यात सांपत्तिकदृष्ट्या चांगला राहील. येणे वसूल होतील. कर्ज असतील तर ते फिटतील. महिलांना हा काळ कौटुंबिक सुखाचा राहील. विद्यार्थी वर्गाला हे वर्ष तसेच लाभप्रद राहील.
मार्च-एप्रिल : या काळात घराच्या समस्या सुटतील. ज्यांचे घराचे स्वप्न आहेत त्याची घराची स्वप्ने पूर्ण होतील. एखादी सुंदरवास्तू होण्याचे योग येतील परंतु या काळात वाणीवर नियंत्रण ठेवावे. कलावंत या लोकाना यशदायी काळ राहील. कलाक्षेत्रात उच्च प्रतिचे यश मिळेल. आपल्या राशीच्या व्दितीयातला रविशुध्द बुध्द योग, कापडव्यवसायात असणार्यांना तसेच शृंगारवस्तूचा व्यापार करणारे व्यापारी किंवा नोकरदार यांना उन्नतीकारक काळ आहे. व्यापारात वृध्दी होईल. लाभेश भाग्यात आल्याने पितृक वारसा हक्क मिळू शकतो. दैवयोगाने श्रीमंत होण्याचे योग येतील. महिला वर्ग दान धर्मासाठी धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च करतील. तृतीयातील हर्बल ज्योतिष तसेच त्यासंदर्भातील विषयाची गोडी निर्माण करेल. शेजार्यांकडून बंधुभगिनी यांच्याकडून उपेक्षा होण्यासारखे प्रसंग येतील. शास्त्रीय अभ्यास बौध्दिक बाबतीत हा श्लोक फळ देईल. परदेश गमनाचे योग देईल.
मे-जून : हा महिना आपणाला थोडा प्रतिकूल राहणार आहे. या काळात स्त्रीचा वियोग होणे तसेच पैशाची उधळपट्टीसारखे योग येतील. आपल्या राशीच्या व्ययात मंगळकडे युती विशेष फलदायी राहणार नाही. या काळाात डोळ्यासंबंधीचे विकार होतील. खर्र्चाचे प्रमाण वाढेल. स्त्रियांनी या काळात चोर भय, हिस्त्र प्राण्यापासून त्रास होणे. यासारख्या गोष्टी होवू शकतील. व्यापारी वर्गाने या काळात देवघेवीचे व्यवहार फार जपून करावे. नोकरीत असणार्यांनी पैशाची किंवा कागदपत्र तपासून ऑफिसची कामे चोख करावी. आपल्या एकीच्या कामामुळे नोकरीवर गदा येणार नाही याची काळजी घ्यावी.
जुलै-ऑगस्ट : हा महिना आपणाला मिश्रफळ देणाराच राहणार. या काळात अनावश्यक वाद-विवादापासून लांब रहा. विवाह जोडीदारासंबंधी एखादी चिंता सतावेल. अष्टमेष शुक्र आपणास एखादी प्रॉपर्टी अथवा पैशाचे लाभ देईल. परंतु निचरातील शुक्र बाह्यख्यालीपणा देईल. त्यासाठी विवाहीत मंडळींनी सयंमाने वागावे. कुठल्याही प्रेमप्रकरणात गुंतला तरर नुकसान होईल. या काळात स्त्रियांनी व तरुण-तरुणींनी वाणीव व्यवहारावर संयम ठेवावा. नोकरीत असणार्यांनी या काळात आपला वरिष्ठाशी संयमाने वागावे. व्यापारी वर्गाने या काळात योग्य नियोजन केल्यास त्याचा फायदा तुम्हाला पुढील काळात होईल.
सप्टेंबर-ऑक्टोबर : महिना अविवाहीताचे विवाह जुळवून आणेल तर ज्यांचे विवाह झाले आहेत त्यंाना संतती सुखाचा आनंद घेता येईल. या काळात होणारी सर्पपित्री अमावस्या आपणास पित्राचे आशिर्वाद मिळतील. पूर्वजासाठी या काळात श्राध्दविधी केला तर आपल्या कार्यातील अडथळे दूर होतील. या काळात व्यापारी वर्गाला लाभातील शनि फायदेशीर असला तरी प्लुटोबरोबर असणारा शनि मित्राकडून फसवणूक होणे, चांगले मित्र देणार नाही. पंचमावर दृष्टी असल्याने संतती संबंधी काळजी निर्माण करेल.
नोव्हेंबर-डिसेंबर : हा महिना आपणास फलप्रद राहील. कोणत्या तरी क्षेत्रात आपणास नावलौकिक मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. जुने मित्र भेटतील, घरात कुटुंबासोबत धार्मिक कार्यात भाग घ्याल. मुलांना आपल्या आवडत्या वस्तुचा उपभोग घेता येईल. या काळात पैशाची आवक चांगली राहील. पण खर्चही त्याप्रमाणे होईल. घरात पाहुण्यांचे आगमन होईल. परंतु वयस्कर मंडळींना या काळात प्रकृतीसंबंधी काळजी घ्यावी लागेल.
कुंभ राशीचे नक्षत्र :
घनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा
घनिष्ठा नक्षत्र स्वभाव : क्रोधी, साहसी (गू, गे)
शततारका नक्षत्र स्वभाव : कठोर, स्वाभिमानी (गाोसासीस)
पूर्वाभाद्रपदा स्वभाव : शांत, विनयशील (से, सो. दा)
घनिष्ठा नक्षत्र असणार्यांनी : मंगळवारी गणपतीला मंदिरात सव्वाकिलो गुळदान करावा. तसेच शनिची पूजन करावे. गणपती दर्शन करावे.
शततारका नक्षत्र असणार्यांनी : मारुती मंदिरात साखर ठेवावी. पिंपळाला प्रदक्षिणा घालावी. तुपाचा दिवा लावावा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र असणार्यांनी : सुवर्ण वर्गाचे वस्त्रदान करावे.
शुभवार : बुध, शुक्र, शनि
९,१०,८,१२ शुभ महिने
शुभ रंग : काळा, तपकिरी, पिवळा
रत्न : नीलम राशीप्रमाणे परंतु ज्योतिषाच्या सल्ल्याने रत्न धारण करावे.
भाग्योदय : वय, वर्ष ३० नंतर