शहर परिसरात युवकांना ब्राऊन शुगर हा नशेचा पदार्थ विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा परदाफाश पोलिसांनी केला असून हे अंमली पदार्थ शहर परिसरात विकणाऱ्या १३ जणांच्या टोळीला त्यांना नशेचे पदार्थ पुराणाऱ्या मुंबई स्थित महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अडीच लाख किंमतीची ब्राऊन शुगरची ४५० पाकीट.मोबाईल संच दुचाकी देखील जप्त केली आहे. बेळगाव पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी आयोजित केलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मंगळवारी सायंकाळी शहर गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक ए एस गोदीकोपप आणि सहकाऱ्यांनी मिळालेल्या माहिती वरून हायवे जवळील जिना बकुळ जवळ पन्नी ब्राऊन शुगर विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांना अटक केली. त्या नंतर या दोन्ही आरोपींनी दिलेल्या माहिती नुसार शहरात कॉलेज, दंगा करणाऱ्यांना आणि इतर युवकांना हे नशेचे पदार्थ विकणाऱ्या इतर ११ युवकत्याना ब्राऊ शुगर पुरवणाऱ्या आणि मुंबई स्थित महिलेला देखील अटक केली आहे.
असे आहेत शहरात ब्राऊन शुगर विकणारे युवक
पोलिसांनी यशीन हसन सनदी वय २४ आझाद नगर बेळगाव ,सुरज शिवाजी शिंदे वय ३९ सदाशिवनगर बेळगाव, शाकीर निजामी वय १९ उज्वल नगर , तबरेज अंडेवाले वय १९ घी गल्ली बेळगाव ,सलीम माकानदार २७ सदाशिवनगर बेळगाव, युवराज सुनील सरनोबत वय २७ कंग्राळ गल्ली, शहाबाज बाळेकुंद्री १९ चिराग नगर बेळगाव , ऐयाज मुल्ला वय २० उज्वल नगर बेळगाव, तबरेज देसाई वय १९ खंजर गल्ली बेळगाव ,वसीम दलवाई वय २९ शाहू नगर बेळगाव , आतिष अनिल सावंत वय २४ शिवाजी नगर बेळगाव शोधन सुरेश हुंदरे वय २४ समृद्धी कॉलनी गणेशपूर,कुतुबुद्दीन अल्ताफ बाळेकुंद्री वय २२ न्यू गांधी नगर बेळगाव यांना अटक करून यांच्या जवळील ४५० ब्राऊन शुगर ची पाकीट ज्याची किंमत १ लाख ३५ हजार आहे ती जप्त केली आहेत .सुशीला पोन्नस्वामी रा . सल्लामुन्डी हॉल जे पी नगर सायन मुंबईसायन मुंबई येथील नशेचे पदार्थ पुरवणाऱ्या महिलेस देखील एक लाख पाहावं हजार किंमतीच्या ३५० ग्रॅम ब्राऊन शुगर सह अटक केली आहे
. दंगल खोराना कॉलेज युवकांत होत होती विक्री
याशींन सनदी आणि सुरज शिंदे हे दोघे जण मुंबई तुन हे ब्राऊन शुगर आणत होते आणि ३०० प्रति ग्रॅम प्रमाणे शहरात विकत होते . सुशीला पोन्नस्वामी देवेंद्र हिच्या कडून ते आणून विकत होते . बेळगाव शहरातील अनेक कॉलेज आणि महा विद्यालयातून या ब्राऊन शुगरचे विक्री होती होती अशी माहिती देखील पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी दिली आहे . बेळगाव शहरात अलीकडे झालेले जातीय दंग्यात दंगेखोर युवकांना हेच ब्राऊन शुगर विकत होते स पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे . या टोळीत आंतर राज्य रॅकेट सामील आहेका याचा तपास पोलिसांनी चालविला आहे
पोलीस करणार जनजागृती
नशेचे पदार्थ सेवन करणे विक्रीत शहरातील अनेक अल्पवयीन युवक सामील आहेत याही माहिती पोलिसांना होती याचाच मागोवा घेत पोलीस तपास होते .ब्राऊन शुगर विकणारे अनेक युवक शहरातील पोलीस स्थानकात अश्या केस मध्ये आरोपी झालेले आहेत त्यामुळे भविष्यात यावर पोलीस जनजागृती करणार आहेत . पुढील महिन्या पासून नशेच्या पदार्थ सेवन आणि विक्री विरोधात पोलीस एक विशेष अभियान हाती घेणार असून जनजागृती करण्यात येईल शी माहिती देखील राजप्पा यांनी दिली . यावेळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर , पोलीस उपायुक्त महानंद नंदगावी देखील उपस्थित होते .