अस्तव्यक्त पार्किंग आणि दुकानदारांची अतिक्रमण यामुळे खडे बाजार शहापुरात अनेकदा गर्दी ट्रॅफिक जॅम चे प्रकार पहायला मिळत होते मात्र पोलीस आणि पालिका प्रशासनाने खडे बाजार शहापूर अडथळे मुक्त बनवला आहे.
कपिलेश्वर मंदिर ते नाथ पै सर्कल पर्यंत चे दुकान दारांनी केलेल अतिक्रमणे हटवली आणि एक बाजूला पार्किंग शिस्त लावली.या भागातील रस्त्यावर विकणाऱ्या भाजी विक्रेत्यांना दाणे गल्लीत स्थलांतर केलं दाणे गल्लीत पालिकेच्या जागेत गेल्या 25 वर्षा पासून अतिक्रमण केलेल्या भाजी विक्रेत्यांना हटवून सदर जागा भाजी विक्रेत्यांना बसून भाजी विकायला अनुकूल करून दिली.
पालिकेच्या वतीनं अभियंत्या लक्ष्मी निप्पणीकर आणि कर्मचाऱ्यांनी तर पोलिसांच्या वतीनं ए सी पी शंकर मारिहाळ आणि पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी मोहिमेत सहभाग दर्शवला होता.
पोलिसांनी शहापूर खडे बाजारात वन साईड पार्किंगची आज लावलेली कायम राहावी हीच इच्छा…
रस्ता खुला केल्याबद्दल महानगरपालिका व पोलीस खात्याचे अभिनंदन