आजची रास मकर–
रास स्वामी शनी- यशदायी वर्ष
-मकर राशी काळ पुरुषाच्या कुंडलीतील दहावी रास आहे या राशीचा अमल दक्षिणेकडे असतोया राशीच्या व्यक्ती कामात तरबेज चिकाटी असणाऱ्या प्रत्येक काम विचारपूर्वक करणाऱ्या ,सात्विक, भावना प्रधान,अभिमानी विनम्र कृतज्ञ विद्वान असतात .दुसऱ्याना मदत करण्यास त्यांना आवडतेपरंतु शिस्तप्रिय असतात परंतु यां स्वतः स्थिर सावर व्हायला वेळ लागतो कष्टाळू वृत्ती त्यामुळे स्व कर्तृत्वावर काही तरी करायची धमक असते .या राशीच्या स्त्रिया कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळणाऱ्या व्यवहारी अध्यात्मिक,समोरच्या व्यक्तीची मन जिंकून घेण्याचुई कला त्यांना चांगलीच अवगत असते न्यायप्रिय असतात.
या राशीचे लोक मुख्यतः करून सरकारी नोकरी हॉटेल व्यवसाय तसेच राजकारण व कला क्षेत्रात उत्तम कार्य करू शकतात त्यामुळे या क्षेत्रात विशेष दिसून येतात या व्यक्तींना सर्दी खोकला मुळव्याधी सारखे आजार सांधे दुखी डोके दुखी सारकही आजार संभवतात धार्मिक संस्थात यांचा वावर असतो या राहसीचे लोक एका चांगला वकील किंवा न्यायधीश होऊ शकतात.
जानेवारी ते फेब्रुवारी महिना आपणास मेहनतीचा असला तरी आपणास यश देखील आपल्या राशीच्या दशमात सुरु असून दहा मेष लग्नी आहे . लग्नातील दहा मेष स्वतःच्या हिमतीवर काही तरी करण्याची संधी आपणास देईल. एक बलवान केंद्र स्थानाचा ग्रह दुसऱ्या केंद्रात जातो सहज मिळणाऱ्या यश पेक्षा आपणास प्रयत्नाने यश देईल त्यामुळे स्वतः प्रयतन करा . यश तुम्हाला नक्की मिळणार आहे नोकरी धंद्यात असणार्याना आहे महिने काही नवीन गुंतवणूक करवेल त्यामुळे नवीन धंद्यात पदार्पण करणे किंवा नाकारीत असणार्याना बढती होईलविध्यार्थी वर्गाने या काळात विशेष लक्ष द्यावे लागेल .महिलानी या काळात स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी .
मार्च एप्रिल हा महिना वृद्ध लोकांना त्रासदायक राहील या काळात चतुर्थातील हर्षल हा वृद्ध व्यक्तींच्या आरोग्य बाबत चांगला नाही तसेच भाडे तत्वावर असणाऱ्या व्यक्तींनी या काळात वारंवार घरे बदलण्याची पाळी येईल प्रॉपर्टी बद्दल वाद निर्माण होईल त्या संदर्भात कोर्ट कचेरीत केस केस प्रसंग येईल . ज्यांच्या स्थावर मालमत्ते विषयी वाद असतील त्यांनी तूर्तास थांबावे हा काळ आपणास प्रतिकूल आहे परंतु हा काळ राजकारणी लोकांना चांगला आहे आपल्या राशीतील लाभाचा मंगळ आपणास यश देईल समाजात मान सन्मानाचे योग येतील लाभतील मंगळ आपली सपत्नीक स्थिती चांगली ठेवेल या काळात विध्यार्थी तसेच तरुण तरुणींना चांगले तरुण भेटतील. मे जून महिला आपणास आत्मविश्वास देईल मकरेतील लग्नातील मंगळ राजकारण आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना शुभ फलदायी राहील जे सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहेत त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही रेल्वे तसेच परिवाहन खात्यातील व्यक्तींना बढतीचे योग्य येतील स्त्रियांना या काळात साहसी कामात यश येईल परंतु या राशीच्या सर्व वयाच्या व्यक्तीना भाजणे कापणे जखमा होणे डोखे दुखीचा आदी त्रास होऊ हसकतो त्या दृष्टीने काळजी घ्यावी. लोखन्ड आणि कोळसा संबंधित वायपर करणार्यांना या काळात फायदा होईल स्त्रियांना मुलांना सहलीचा आनंद उपभोगता येईल.
जुलै आगष्ट हा महिना वैवाहिक जीवनात चढ उतार देईल कारण लग्नातील मंगळकांड व सप्तमीतील राहू बुध पती पत्नीत मतभेद घडवेल . विवाह सुखास लग्नातील मंगळ चांगला नाही व्यापारी वर्गाला वक्ता प्रवचन कार याना हा बुध उत्तम फळे देईल परंतु आपल्या राशीच्या अष्टम स्थानी येणारा शुक्र वारसा हक्काने बक्षीस रूपाने काही तरी संपत्ती मिळण्याचे योग येतील . अष्टमातील शुक्र कर्मश्रयात जास्त पैसा मिळवून देईल अचानक धनलाभाचे योग येतीलविवाहित पुरुषांना किंवा स्त्रियांना सासुरवाडी कडून काही तरी धन लाभ होईल हा शुक्र तरुण तरुणींना अनीती मार्गावर नेऊ शकतो त्यामुळे या काळात संयमाने वागावे सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध चांगला जाईल या काळात वडिलांच्या धंद्यात वाढ होईल भाग्यातील बुद्ध आणि शुक्र प्रवासाचे योग्य देईल विदेश दौऱ्याचे योग्य येतील राजकारणातील लोकांना अधिकार पद प्राप्त होईल .
विदेश करून विध्यार्थी वर्गाने या काळात शिक्षण संदर्भात बाहेर गावी गेल्यास त्याचा फायदा होईल चांगल्या संस्थेत प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने काळ चांगला आहे स्त्रियांना धार्मिक कार्यात भाग घेण्यास संधी मिळेल किंवा त्या दृष्टीने प्रवास घडेल . येथील रवी बुध युती लेखक, कवी कलावंत याना फळ प्रद राहील आपल्या दशमातील गुरु सार्वजनिक संस्था व त्या संबंधीची कामे करणाऱ्याना चांगले राहील वरिष्ठा कडून आपले कौतुक होईल स्त्रियांना कौटुंबिक सुखातील वाढ होईल व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते मान सन्मान मिळतो . नोव्हेंबर डिसेंबर महिला आपणास सर्व बाबतीतही उत्तम राहिला आपल्या लाभात येणारा गुरु नोकरी धंद्यात तर यश देईलच परंतु अविवाहित तरुण तरुणींना विवाहाचे योग येतील तसेच गरोदर स्त्रियांना पुत्र संततीचे योग येतील ज्यांची मूले मोठी आहेत अश्याना मुलांकडून काही यश दायी गोष्टी घडून येतील .स्त्रियांना या काळात घरातील वडील धाऱ्याकडून मान मिळेल कौटुंबिक द्विगुणित होईल सर्व क्षेत्रातील लोकांना हा काळ विशेष लाभदायी राहील परंतु प्रेम प्रकरणात असणाऱ्यांनी या काळात सावध राहावे शुक्र हर्षल प्रति योग कमकुवत करील किंवा प्रेम प्रकरणी विस्कटतील .
मकर राशीचे नक्षत्र
उतराषाढा .श्रवण धनिष्ठा असून उत्तरा षाढा नक्षत्राचा स्वभाव – तेजस्वी ,अभिमानी,
श्रवण- नक्षत्र -स्वभाव -धार्मिक ,विनम्र
धनिष्ठा -नक्षत्र- स्वभाव -कठोर ,साहसी
उपासना
उत्तरषाढा नक्षत्र असणाऱ्यांनी शनिवारी मीठ उडीद शनीला वाहावे
श्रवण नक्षत्र असणाऱ्यां व्यक्तींनी मारुती किंवा शनीला रुद्राभिषेख करावा
धनिष्ठा नक्षत्र असणाऱ्या व्यक्तींनी रविवारी शमीची पूजा करावी उत्तराषाढा नक्षत्र असणाऱ्यांनी काळे चणे दान करावे
श्रवण नक्षत्र असणाऱ्यांनी सव्वा किलो गूळ दान करावा
धनिष्ठा नक्षत्र असणाऱ्या व्यक्तींनी पांढरे तांदूळ दान करावे
सध्या साडे साती काळ असल्याने सर्व मकर राशीच्या लोकांनी शनिवारी मारुतीला जावे पहिली अडीच वर्षे यशदायी राहतील
अंकशास्त्रा प्रमाणे ८ हा आकडा शनीचा आहे
शुभवार – बुधवार ,शनिवार
शुभमहिने -९,१०, १२
शुभ रंग -काळा तपकिरी पिवळसर
शुभ रत्न – नीलम राशी प्रमाणे
परंतु हे रत्न ज्योतिषाच्या सल्लया नुसारच घालावे वयाच्या ३० नंतरच भाग्योदय असणार आहे.