दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलीस कर्मचार्यावर ,कारवाईची मागणी करत दलित संघटनांनी खडे बाजार पोलीस स्थानका समोर ठिय्या आंदोलन केलं होते. भीमा कोरेगाव घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विविध दलित संघटनानी निषेध मोर्चाचे आयोजन केले होते त्या वेळेस दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली नसून पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यावर कारवाई करण्या ऐवजी दोघं युवकांना शिवीगाळ करून मारहाण केली असल्याची देखील तक्रार यावेळी केली.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी सुटका करा अशी देखील मागणी केली खडे बाजार ए सी पी यांच्या सोबत दलित कार्यकर्त्यांचा वाद झाला. यावेळी मल्लेश चौगुले गजाजन देवरमनी,सिद्राय मैत्री मल्लेश कुरंगी अशोक अयनांवर आदी यावेळी उपस्थित होते