भीमा कोरेगाव,विजापूर दलित युवती अत्त्याचार आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी काढलेल्या निषेध मोर्चास गालबोट लागले असून दुकानांवर बसेस वर दगडफेकीचे प्रकार घडले आहेत.
बुधवारी विविध दलित संघटना कडून संभाजी चौकातून जिल्हाधिकारो कार्यालया पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार होता तो मोर्चा सुरू होण्या अगोदरच अज्ञातां कडून सिव्हिल हॉस्पिटल मार्गावरील सुमारे दहा ते बारा दुकानांवर,परिवाहन मंडळाच्या बसेस दगडफेक करण्यात आली.या दगडफेकीच्या प्रकाराने शहरात काळ तणाव निर्माण झाला होता.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .