पार्किंग केलेल्या कार गाड्यांवर बिअर बाटल्या आणि दगडफेक करून काचा फोडून लाखोंचा नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे.सी पी एड मैदानावर अन्नोत्सव पहाण्यासाठी आलेल्या लोकांच्या केलेल्या केलेल्या पार्किंग मध्ये या गाड्यांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आलं आहे.
बेळगाव live कडे उपलब्ध माहितीनुसार 4 फॉरचूनर,3 होंडा सिटी,2 क्रेयेटा अश्या एकूण 12 गाड्यांचा काचा फोडण्यात आल्या आहेत.रात्रीनऊ च्या दरम्यान अज्ञाता कडून हा निंद्य प्रकार उघडकीस आला आहे.प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेल्या नुसार रात्री गोवा पासिंग च्या लाल कार मधून काही युवक आले त्यांनी बियर बाटल्या आणि दगडफेक केली लागलीच पलायन केले.
शहरातील सी पी एड मैदानावर अन्नोत्सव(फूड फेस्टिव्हल) आयोजन केले आहे यात सहभागी होण्यासाठी शहरातील लोकांची गर्दी वाढत आहे त्या गर्दीत पार्किंग मध्ये लावलेल्या या महागड्या गाड्यांचा काचा फोडल्या आहेत.या प्रकरणी आयोजकांनी कॅम्प पोलिसात तक्रार नोंद केली आहेत.
See. All dear police dept
This is our BELGAUM
Belgaumities need to every where
CCTV