बेळगाव दक्षिण मतदार संघात जातीच्या राजकारणावर आधारित तिकीट देण्याची वेळ विणकर समाजाने आणून ठेवली आहे. विणकर समाजाने आपल्या समाजाचं नेतृत्व करणाऱ्या समाजातील दोन चेहऱ्यांना प्रोजेक्ट करायला सुरुवात केली आहे.
वडगाव आनंद नगर येथे या समाजाच्या शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप कडून पी डी धोत्रे तर काँग्रेस कडून एम डी लक्ष्मीनारायण याना पुढील निवडणुकीत उमेदवारी साठी पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे.
बनशंकरी शिक्षण संस्थेच्या तात्या साहेब मुसळे विद्यालय या कन्नड माध्यमाच्या शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात काँग्रेस आमदार एम डी लक्ष्मीनारायण, भाजप नेते पी डी धोत्रे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी या दोन्ही नेत्यांना आपापल्या पक्षातून उमेदवारी साठी जोरदार प्रयत्न करायचे ठरले. कार्यक्रमात विणकर समाजातील पंच परशराम ढगे ,भोजप्पा हाजेरी ,निर्मला कामकर,चोपडी, केदार ढगे, दोडप्पा सातपुते आदी उपस्थित होते .
भाजप आणि काँग्रेस कडून विणकर समाजातून दोघाची नावे सध्या चर्चेत आहेत. त्यातच हळूहळू समजातून पाठिंबा मिळत असल्याने विणकर समाजाने उमेदवारी मिळवण्यासाठी आपला दावा मजबूत केला आहे. याचा विचार दोन्ही पक्षांनी करावाच लागणार आहे. सध्यस्थितीत विणकर समाज आपल्या समाजाच्या नेतृत्वासाठी एकत्रित येत असून भाजप किंवा काँग्रेस कोणता पक्ष विणकराला उमेदवारी देतो हे पाहणे महत्वाचे आहे.