आजची राशी ” धनू”
(राशीस्वामी- गुरू)
||अडचणींवर मात करायला शिकाल||
राशी वैशिष्ट्ये
धनू ही कालपुरुष कुंडलीतील नववी राशी आहे. या राशीचे स्वामित्व पूर्वेला असते. अग्नितत्वाची रास आहे. या राशीचे लोक हे प्रेमळ स्वभावाचे, मर्यादाशील, मणी आणि दुसऱ्याला मदत करणारे असतात. अधिकारप्रिय आणि क्षमतेपेक्षा जास्त कार्यशाली असतात.स्वभाव वैशिष्ट्ये
या व्यक्ती दयाळू, धार्मिक, दुरदृष्टीच्या असतात. हे पटकन कुणावर विश्वास टाकत नाहीत. कष्टाने हे पुढे येतात. कठीण श्रमातूनच त्यांना यश मिळते. हे सहसा कुणाशी वैर करत नाहीत, जशी समोरची व्यक्ती तसे ते वागत असतात.
गुरूचा अंमल असल्याने धार्मिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सोने चांदी व्यापार, कलावन्त, लेखक आशा क्षेत्रात हे लोक दिसून येतात.
यांना मज्जासंस्थेचे विकार, यकृत, पोटाचे विकार, घशाचे विकार विशेष दिसून येतात.
वार्षिक ग्रहमान
जानेवारी, फेब्रुवारी हा काळ आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल नाही. अपचन, पोटाचे आजार, घशाचे आजार होतील, हे दोन महिने व्यापारी वर्गाला धावपळीचे जातील. खर्च वाढतील, औषध पाण्यावर विशेष खर्च होतील, याकाळात स्थावर मालमत्तेचे व्यवहार जपून करावेत , विध्यार्थ्यांना सहलीचा आनंद लुटता येईल. त्यांनी वाणीवर मात्र नियंत्रण ठेवावे. खोटे बोलू नये.
मार्च व एप्रिल हा काळ कलावंतांना अति उत्तम राहील. कलाक्षेत्रात काम करणारे लोक आणि विध्यार्थ्यांना हा काळ चांगला आहे. कौटूंबिक वातावरण प्रसन्न राहील. नवीन वाहने खरेदी करण्यास उत्तम कालखंड आहे. वाहन सौख्य, विध्या व्यासंग घराचे समाधानकारक वातावरण प्राप्त होईल. धार्मिक वृत्ती, मानसन्मान मिळेल. आपल्या इच्छा तृप्त होतील, मित्र, मैत्रिणींचे सहकार्य मिळेल, नवीन मालमत्ता खरेदीचे योग येतील.
मे व जुन हा काळ मध्यम फळ देणारा राहील. याकाळात गरोदर महिलांनी प्रकृतिची काळजी घ्यावी. तसेच सट्टा, रेस, शेयर मार्केट यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी काळजी घ्यावी, हा काळ गुंतवणुकीस प्रतिकूल राहील. विध्यार्थी दशेतील व्यक्तींनी काळजी घ्यावी, कुठलेही वाईट व्यसन लागू देऊ नये.
जुलै, ऑगस्ट हा काळ कुटुंबातील वातावरण बिघडवेल, वादविवाद घडतील, सरकारी नोकरीत असणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. व्यापारी क्षेत्रातील लोकांनी व्यवहार विचारपूर्वक करावे. विश्वासघात व फसवणुकीने आर्थिक तोटा सहन करावा लागेल. गृहिणींनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. विध्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण होईल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यक्तींना प्रवासातून यश मिळेल.
सप्टेंबर , ऑक्टोबर हा काळ भागीदारीत असणाऱ्यांना तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला राहील, राजकीय कामांसाठी प्रवास घडेल. लाभदायक राहील. व्यावसायिक व नोकरदारांना हा काळ लाभदायक आहे. विवाह जमण्याचे योग्य येतील, वयस्कर मंडळी आपल्या कुटुंबासमवेत आनंदात वेळ घालवतील.
नोव्हेंबर, डिसेंबर याकाळात वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीची चिंता वाढेल. काळजी घ्यावी. स्त्रीयांकडून दानधर्म घडेल, विध्यार्थी वर्गास सहलीचा आनंद घेता येईल, व्यापारी वर्गास फार अनुकूल काळ नाही. तोटा होऊ शकतो. नोकरीत वरीष्टांपासून त्रास संभवतो, संयमाने राहावे. चंद्रग्रहण मध्यम फलदायी असल्याने अनुकूल व प्रतिकूल अशी दोन्ही प्रकारची फळे मिळतील. शनीची साडेसाती असल्याने आरोग्यावर परिणाम जाणवेल. सहनशील राहिल्यास शनीचे भ्रमण आपणास संकटांवर मात करण्याची शक्ती देईल.
काही महत्वाचे
# धनू राशीतील नक्षत्रे: मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा
# मूळ स्वभाव : दयाळू, परोपकारी नाम अक्षर : ये, यो
# पूर्वाषाढा स्वभाव : शौकीन, अभिमानी नाम अक्षर : भ, भी, भू, ध, क, ढ
# उत्तराषाढा स्वभाव : धनी, शीत नाम अक्षर: भ
उपासना
# मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी काळ्या कुत्र्याला चपाती घालावी. केतूचा जय करावा.
# पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी कुलदेवीला अभिषेक करावा, पिंपळाच्या खाली दहीभात ठेवावा. दुर्गास्तोत्र वाचावे.
# उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी गाईला गूळ, हरभरा डाळ हरभरा डाळ घालावे.. सुर्यमंत्राचा जप करावा.
# भाग्यरत्न राशीप्रमाणे पुष्कराज
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
# शुभवार : मंगळवार, गुरुवार
# शुभमहिने : मार्च, एप्रिल, ऑगस्ट, सप्टेंबर
#रंग : जांभळा, सोनेरी
( भाग्योदय वयाच्या २१ ते ३० या दरम्यान होईल)