बेळगाव विभाग प्रादेशिक आयुक्त पदी पूर्वी जनप्रिय मनपा आयुक्त म्हणून काम पाहिलेले अधिकारी पी ए मेघणावर यांची नियुक्ती झाली आहे, सोमवारी ते या पदावर रुजू झाले.
प्रादेशिक आयुक्त हे महसूल विभागातील महत्वाचे पद आहे. कर्मचारी नियुक्ती, विकास, एच आर आदी कामे यांचे व्यवस्थापन, गाव ते जिल्हा पातळीपर्यंतचे महसूल रेकॉर्ड, सर्व सँबंधीत कार्यालयांची तपासणी, नैसर्गिक आपत्ती आल्यास नियोजन, निवडणूक निरीक्षण या आणि इतर जबाबदाऱ्या संभाळाव्या लागतात.