(राशीस्वामी- मंगळ)
||संयमाने राहा||
राशी वैशिष्ट्ये
वृश्चिक ही कालपुरुष कुंडलीतील आठव्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीचे स्वामित्व उत्तरेला असते. या राशीचे लोक उत्साही, साहसी, हट्टी, उतावीळ स्वभावाच्या तसेच आतल्यागाठीच्या असतात. हे लोक मनाचा अंत लागू देत नाहीत.
स्वभाव वैशिष्ट्ये
यांच्यात तप्तपणा, हेकेखोरपणा दिसून येतो. या व्यक्ती विशेष करून कुणाच्या प्रभावाखाली राहत नाहीत. या राशीच्या स्त्रिया दिसण्यात उंच, गहुवर्णीय, क्वचित गौरवर्णीय तसेच थोड्या फटकळ स्वभावाच्या परंतु कष्टाळू वृत्तीच्या, काटकसरी स्वभावाच्या, थोड्या अहंकारी स्वभावाच्या महत्वाकांक्षी व स्वाभिमानी असतात.
या लोकांची वृत्ती साहसी व कष्टाळू असल्याने आशा व्यक्ती पोलीस, मिलिटरी, अग्निशामक तसेच गुप्तहेर खाते यात काम करताना आढळतात, मेकॅनिकल क्षेत्रात या विशेष दिसतात, यात दोन प्रकारचे स्वभाव आढळतात, एक चांगल्या वृत्तीचे प्रामाणिक तर दुसरे गुन्हेगारी प्रवृत्तीचे, राजकारणातही हे लोक दिसून येतात.
वार्षिक ग्रहमान
जानेवारी, फेब्रुवारी याकाळात आपणास ग्रहमान थोडे प्रतिकुलच राहील, आर्थिक बाबतीत चढ उताराचा असा महिना राहील, व्यापारी लोकांना हा महिना व्यापारात विशेष प्रगती करणारा नसेल. त्यामुळे व्यापारी वर्गाने नवीन प्रकल्पात हात घालू नये. किंवा नवीन नोकरी व्यवसाय करू नये.
विध्यार्थी वर्गाने या महिन्यात अभ्यास नीट करावा. शिक्षणात अडथळा निर्माण होऊ शकतो, शनीच्या साडेसातीमुळे थोड्या अडचणीचा सामना करावा लागेल, तरी वृश्चिक राशीच्या सर्व वयोगटातील व्यक्तींनी हे वर्ष संयमाने घ्यावे.
रात्रीच्या अंधारातून सुखद पहाट तुमच्या जीवनात येईल, ३१ जानेवारीला होणारे ग्रहण तुमच्या राशीला शुभ फळ देणारे असणार आहे. त्याचे चांगले परिणाम पुढील दोन महिन्यात दिसून येतील.
मार्च व एप्रिल हा काळ तास बरा राहील,नवनवीन उपाय योजना राबवाल, नैतिक आचरण बलवत्तर होईल, वृश्चिक राशीतील लग्नातील मंगळ हा या महिन्यात आपल्या राशीत आहे त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल, साहसी वृत्ती वाढेल.
व्यापारी लोकांनी याकाळात घाई गडबडीने निर्णय घेऊ नये. शांतपणे निर्णय घेतले तर तडीस जातील, याकाळात डोक्यासंबंधी इजा होणे , उष्णतेचे विकार होऊ शकतात. लहान मुलांनी छोट्या मोठ्या अपघातापासून जपावे, महिलांनी याकाळात मुलांकडे( या राशीच्या) विशेष लक्ष द्यावे, विध्यार्थ्यांना याकाळात केलेल्या कामात यश मिळेल.
मे व जुन हा महिना महिला वर्गाला थोडा कौटुंबिक अशांतीचा जाणवेल, याकाळात तृतीय स्थानातील मंगळ शनी हे ग्रह घरात अशांतता निर्माण करतील, खर्च वाढेल, नकोत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. याकाळात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी प्रयत्न करावेत.
सरकारी नोकरीचे योग येतील. याकाळात पंचमातील रवी, बुध, शुक्र मुलांबद्दल चांगल्या बातम्या देतील. गरोदर स्त्रियांना याकाळात जपावे. वयस्कर लोकांनी प्रकृतीवही काळजी घ्यावी. पायाला पेटके येणे, गुडघा संबंधी त्रास उद्भवू शकतात. शक्यतो प्रवास टाळावे, शेजाऱ्यांशी जमवून घ्यावे लागेल.
जुलै, ऑगस्ट हा महिना आपणास उत्तम राहील, विध्यार्थी याकाळात विशेष पराक्रम करून दाखवतील, तसेच ट्रान्सपोर्ट व ट्रॅव्हल्स व्यवसायात असणाऱ्यांना धंद्यात फायदा होईल. मैदानी खेळात असणाऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील.
या महिन्यात व्यापारी लोकांना लांबचे प्रवास होतील, राजकारणी लोकांना याकाळात नवीन धोरणे आखण्यास उत्तम राहील, ऑफिस मध्ये बसून नवीन योजनेबद्दल विचार विनिमय होईल. त्याचे फायदे पुढील दोन महिन्यात होतील. याकाळात नवविवाहितांना संतती योग येईल, महिलांना कौटुंबिक सुखाचा आनंद मिळेल. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल.
सप्टेंबर , ऑक्टोबर हे महिने आपणास नवीन आशा निर्माण करतील. परंतु नको त्या मार्गाला आपण लागणार नाही याची काळजी घ्यावी. व्ययातील शुक्र चैनीवर खर्च करवेल, गुप्त प्रेमसंबंध निर्माण करेल. बाहेरख्यालीपणा देईल. त्यामुळे विवाहित मंडळींनी यासंदर्भात काळजी घ्यावी. आशा स्थितीत मनुष्य अब्रूची पर्वा करीत नाही याकाळात गरोदर स्त्रियांना होणारी संतती चांगली होईल, व्यापारी वर्गाला नवीन संधीचा फायदा होईल, कोर्टकचेरीच्या कामात यश देणारा हा काळ आहे. ज्याची केस असेल त्यांना त्यात यश लाभेल. बाहेरील बाधांपासून मात्र जपावे. यामुळे याकाळात या राशीच्या लहान मुलांना जपावे.
नोव्हेंबर, डिसेंबर हे महिने व्यापारी वर्गाला व नोकरदारवर्गाला फलप्रद असतील. लागणे जुळतील. ऑक्टोबर मध्ये आपल्या राशीतच गुरू आल्याने त्यानंतर संपूर्ण वर्षभर गुरुबळ चांगले आहे. घरात मंगलकार्ये होतील, तसेच महिलांना छोट्या सहलीचा आनंद घेता येईल. साडेसातीचा शेवटचा टप्पा असल्याने आपण संयमाने राहावे, त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल, हट्टीपणा सोडावा, समजूतदारपणे वागावे, यश तुम्हाला नक्की मिळेल, वृश्चिक राशीचे लोक प्रयत्नाने यश संपादन करतात याची प्रचिती पुढिल काळात येईल.
काही महत्वाचे
# तूळ राशीतील नक्षत्रे: विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा
# विशाखा स्वभाव : जिज्ञासू, भावूक नाम अक्षर : तो
# अनुराधा स्वभाव : न्यायप्रिय, हत्ती नाम अक्षर : ना, नी, नू, ने
#ज्येष्ठा स्वभाव : शीघ्रकोपी, ऐश्वर्यशाली नाम अक्षर: नो, या ,यी, यउपासना
# विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी मंगळवारी तांब्याची वस्तू दान करावी. सप्तशनी पाठ करावा.
# अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी बेडशीट किंवा चादर गरिबाला दान करावी. अथवा गणपती मंदिरात सव्वाकिलो गुळ द्यावा. शनी स्तोत्र वाचावे.
# विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी पादत्राणे दान करावे.. सप्त शनीचे पाठ वाचावे. विष्णूसहस्त्र नाम वाचावे.
# भाग्यरत्न राशीप्रमाणे पोवळे
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
# शुभवार : मंगळवार, गुरुवार, शुक्रवार
# शुभमहिने : जानेवारी, मार्च, एप्रिल, जुलै
#रंग : तांबडा, नारिंगी, गुलाबी
( भाग्योदय वयाच्या २७ या वर्षांपासून होईल)