belgaum

मध्यवर्तीच्या बैठकीत स्वार्थी राजकारणाचा कलगीतुरा

0
742
Khanapur mes
 belgaum

खानापूर तालुक्याचे आमदार आणि माजी आमदार यांनी शनिवारच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत जी वादावादी केली आणि जो गोंधळ घातला, तो प्रकार मध्यवर्तीच्या प्रतिष्ठेला बाधक आहे.
१७ जानेवारीला समितीने हुतात्मा दिन कसा पाळावा याबद्दल ही बैठक होती. बैठकीत साऱ्या चर्चा होतानाच खानापूर तालुका समिती पदाधिकारी निवड प्रक्रियेचा वाद उफाळून आला, स्वतः आमदार अरविंद पाटील यांनी त्यात तोंड घातल्याने माजी आमदार दिगंबर पाटीलही भडकले, विलास बेळगावकर मध्यवर्ती समितीत नाहीत असा मुद्दा आमदारांनी काढला आणि मूळ बैठकीचे पावित्र्य भंग करण्यात आले.
या प्रकाराने निर्माण झालेला वाद आजचा नाही, स्वार्थी राजकारणातून निर्माण झालेला हा कलगीतुरा त्यातून व्यक्त झालाय. ज्यांनी पद मिळवून दिले ते आता पदावरील व्यक्तीच्या विरोधात आणि पदावरील व्यक्तीही आपले अस्तित्व जपण्यासाठी त्यांच्या विरोधात असे वातावरण खानापूर तालुक्यात वाढले आहे.
या स्थितीचा फायदा राष्ट्रीय पक्षांना होऊ नव्हे हे साऱ्यांनीच लक्षात घेतल्यास महत्वाचे, नाहीतर मध्यवर्ती ने आजवर केल्याप्रमाणे दुर्लक्षच झाल्यास नुकसान अटळ आहे.

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.