नारायण गौडा हे माकड आहे शिवाजी महाराज देशाचं आराध्य दैवत आहे बेळगाव सह सीमाभागात छत्रपती शिवाजी महाराज की जय सातत्याने म्हणणारच अश्या शब्दात कन्नड रक्षण वेदिकेचे अध्यक्ष गौडाच निषेध करण्यात आला.
गौडाने समाजात तेढ करणारी वक्तव्ये थांबवावी आणि सरकारने कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली.
यावेळी हुतात्मा दिन गांभीर्याने तर युवकांचा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.17 जानेवारी रोजी बेळगाव सह सीमा भागात हुतात्मा दिन गांभीर्याने तर 12 रोजी होणारा युवकांचा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्ष स्थानी तालुका समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार उपस्थित होते.माजी आमदार मनोहर किणेकर,एस एल चौगुले,एल आय पाटील,जिल्हा पंचायत सदस्या सरस्वतीं पाटील,माधुरी हेगडे, युवा आघाडी अध्यक्ष शाम पाटील उपस्थित होते.12रोजी होणाऱ्या युवकांच्या मेळाव्यास बार्शी येथील युवा वक्ते खंडू डोईफोडे हे उपस्थित राहणार आहेत.
युवकांना सीमा प्रश्नांची जाणीव करून देणे,लढा आक्रमक करण्यासाठी युवकांचा मेळावा आयोजित केला आहे असं मत युवा आघाडी अध्यक्ष शाम पाटील यांनी मांडले
मराठी भाषा संपवू पाहणाऱ्यांना हक्क डावलनाऱ्याना धडा शिकवण्यासाठी संघटित होने गरजेचे म्हणूनच युवकांचे मेळावे यशस्वी करा असं आवाहन माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.हुतात्म्यांच रक्त वाया जाऊ नये यासाठी राज्य सरकारला आणि राष्ट्रीय पक्षाना एकीची वज्रमुठ दाखवून देऊ कंग्राळीत अभिवादन तर बेनकनहळळीत युवक मेळावा यशस्वी करू अस मत जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी व्यक्त केले.