आजची राशी “ कन्या”
(राशीस्वामी- बुध)
|| सुखाचा अंकुर दिसेल ||
राशी वैशिष्ट्ये
कन्या ही कालपुरुष कुंडलीतील सहाव्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या अंमल दक्षिणेकडे असतो. या राशीचे लोक बुद्धिमान असतात. हस्तकुशल, भावनाप्रधान,हळव्या मनाच्या असतात. यांच्या बुद्धिमत्तेमध्ये चौकस व चिकित्सकपणा असतो. संशयिवृत्तीच्या, हिशोबी, मनाचा अंत लागू न देणाऱ्या असतात.
स्वभाव वैशिष्ट्ये
या राशीच्या व्यक्तींना सौदर्याची विशेष आवड असते.रसिक वृत्तीच्या असतात. थोड्या लहरी स्वभावाच्या असतात. एखाद्या गोष्टींच्या तळापर्यंत जाणे त्याचे मर्म शोधून काढणे हे त्याचे वैशिष्ट्य असते. कमी वयातच त्यांना व्यवहार ज्ञान संपादन होते. आपल्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग या व्यक्ती करतात. त्यांची स्मरण शक्तीही दांडगी असते. भावनाप्रधान असतात.
दुसऱ्यामधील उणीव शोधून काढण्यातही हुशार असतात.गूढ विषयांची आवड असल्यामुळे कुठलीही गोष्ट शोधून काढण्यात अगदी चतुर असतात. कुटुंबापेक्षा यांना समाजात जास्त मान मिळतो. या ताशा समाजप्रिय असतात. सामाजिक कार्यात भाग घेणे यांना आवडते, मित्रा परिवार मोठा असतो. परंतु यांना गुप्त शत्रूपासून त्रास होतो. वकील, व्यापारी, बौद्धिक क्षेत्र, गुन्हेशोधक, आयकर या क्षेत्रात हे लोक विशेष काम करतात. यांना पोटाचे विकार होतात. गुडघेदुखीचा त्रास होतो, पित्ताचे विकार आढळतात.
जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात आपणास सभा समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. याकाळात कौटुंबिक सुखाचा पुरेपूर अनुभव घ्याल.मिष्टान्न व मेजवानीचे योग आहेत. छोट्या मोठ्या सहली किंवा धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. स्त्रियांना हौस मौज पुरवण्याचा काळ आहे, अचानक धनलाभ होतील.खर्चही तसाच होईल. व्यापाऱ्यांना हा काळ आर्थिक दृष्ट्या चांगला जाईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. मुलांचा उत्कर्ष होईल. हा योग चांगला आहे.
मार्च व एप्रिल हा काळ आपल्याला बंधू भगिनी यांच्या सौख्याच्या दृष्टीने थोडा त्रासदायक जाईल. आपल्या राशीपासून तृतीय स्थानावर असणारा वृश्चिकेचा मंगळ बंधू भगिनी सौख्याच्या दृष्टीने चांगला नाही. भाऊबंधामध्ये वाद निर्माण होणे, शेजारी लोकांशी वादविवादाचे प्रसंग येतील. आपल्या पराक्रमातही वाढ होईल. विध्यार्थी व क्रीडाक्षेत्रातील सँबंधीत व्यक्तींना चांगला फायदा होईल. विध्यार्थी खेळामध्ये उत्तम कामगिरी दाखवतील. याकाळात आपणास कण, घसा, नाक याविषयी दुखणी होऊ शकतील. त्यादृष्टीने आपण काळजी घ्यावी. एप्रिल मध्ये स्थावराबद्दल अस्थिरता देतो. यामुळे मिळकती खरेदीची कामे असतील किंवा नवीन घर खरेदीचा विचार करत असाल तर आपला निर्णय काहीकाळ पुढे ढकलावा, याकाळात या विषयीची कामे अर्धवट होतील, त्यामुळे ती पुढे ढकलावी.
मे व जुन ला आपल्या राशीच्या पंचमात मंगळ केतू युती होत आहे. पंचमातील मकरेंचा मंगळ व्यापारात उन्नतीकारक असला तरी गर्भवती स्त्रियांना तो विशेष चांगला नाही. त्यांनी याकाळात विशेष काळजी घ्यावी. तसेच तरुणींना मासिक धर्माचे त्रास होणे व इतर आजार होऊ शकतात. पंचमातील मंगळ संतती मध्ये पराक्रम दर्शवितो. त्यामुळे विध्यार्थी दशेतील मुले एखाद्या क्षेत्रात यश मिळवू शकतील.
आपल्या चतुर्थातील शनी आईशी मतभेद घडवतो, किंवा आईच्या प्रकृतीची चिंता दाखवतो, त्या दृष्टीने मातेची काळजी घ्यावी, तसेच हा शनी लग्नालाही पाहत असल्याने आपल्या अंगात कामाचा उत्साह राहणार नाही. प्रकृती नरम गरम राहील.
जुलै, ऑगस्ट महिना राजकीय क्षेत्रात असलेल्या मंडळींना चांगला राहील, वायुराशीतील रवी हा राजकारणात पुढे आणतो. राजकीय क्षेत्रातील लोकांना याकाळात यश मिळेल. नवीन संधी उपलब्ध होतील. मानसन्मान लाभेल. दशमेश रवी हा कुल दीपक योग देतो. दशमेश लाभ स्थानात जात असल्याने व्यापारी वर्गाला याकाळात भरपूर पैसा मिळू शकतो. मात्र एखाद्या मित्राकडून त्रास संभवतो. या राशीच्या महिलांना याकाळात छोट्या मोठ्या उद्योगातून धनप्राप्ती होईल.
सप्टेंबर , ऑक्टोबर हा महिना अतिउत्तम राहील. वर्षाच्या सुरुवातीच्या काळापेक्षा उत्तरार्ध आपणास चांगला राहील. येते चार महिने आशेचा किरण दाखवतील. या राशीच्या सर्व वयाच्या व्यक्तींना हा अनुभव येईल. सप्टेंबर महिन्यात आपल्या राशीतच बुध लग्नी येत असल्याने लेखन, साहित्य क्षेत्र, पत्रकार, कवी यांना हा काळ अत्यंत चांगला आहे. याकाळात नवीन साहित्य विषयीची कामे होतील. नवीन काव्यनिर्मितीला चांगला काळ आहे.
याकाळात या राशीच्या व्यक्तींनी औषधे डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावीत. चुकीचे औषध घेतल्याने विचित्र परिणाम होऊ शकतात, षष्ठातला नेपच्यून विचित्र आजार, विषबाधा, री एक्शन करवितो.
नोव्हेंबर, डिसेंबर हे महिने पैशांच्या बाबतीत चांगले जातील. याकाळात आपण पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल. त्याप्रमाणे पैसाही तुमच्या हातात खेळेल. नोकरदार वर्ग, या काळात नवीन नोकरीच्या शोधात असाल तर नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. पदोन्नती होईल, महिलावर्ग तसेच तरुणांना याकाळात केलेला प्रवास सुखकर राहील.
आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. याकाळात आपण भागीदारी व्यवसाय करण्यापेक्षा स्वतःचे काही करून मेहनत घेतल्यास ते जास्त फलप्रद जाईल. संतती योग येतील, तरुण तरुणींना प्रेमात यश मिळेल. वयस्कर मंडळींना याकाळात प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
काही महत्वाचे
# कन्या राशीतील नक्षत्रे: उत्तरा, हस्त, चित्रा
#उत्तरा स्वभाव : तेजस्वी, स्वाभिमानी नाम अक्षर : हो, प, पी
# हस्त स्वभाव : उत्साही, विनम्र नाम अक्षर : पू, ष, ण, ठ
#चित्रा स्वभाव : रागीट,जिज्ञासू नाम अक्षर: पे, पो
उपासना
# उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी पूर्ण काळ्या गाईला चारा घालावा. व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करावा.
# हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी सोमवारी दूध दान करावे. सुर्यष्टक स्तोत्र वाचावे
#चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी मंगळवारी जिलेबी दान करावी. गणपती अथर्वशीर्ष वाचावे.
# विध्यार्थी वर्गाने अथर्वशीर्ष वाचावे, या राशीच्या विद्यार्थ्याने सूर्याला अर्ध्य ध्यावे, यशप्राप्ती होईल.
# भाग्यरत्न राशीप्रमाणे पाचू
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
# शुभवार : बुधवार, गुरुवार, शुक्रवार
# शुभमहिने : ऑगस्ट, ऑक्टोबर, फेब्रुवारी, जून
#रंग : पंधरा, आकाशी, हिरवा
( भाग्योदय वयाच्या २३ते ४१ या काळात होईल)
Perfect