भीमा कोरेगाव मध्ये जे घडले किंवा त्यानंतर जे काही घडत आहे, ते टाळता येणे शक्य आहे. यासाठी साऱ्यांनी एकत्रितपणे लढा देणे गरजेचे आहे. असे मत समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
बेळगाव येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आमचे कार्यकर्ते यावर जे काम करत आहेत ते सर्वत्र होणे आवश्यक आहे. आम्ही गावागावात जातो आणि तेथील दलित लोकांच्या शेतात जाऊन राबत राहतो, त्यांना जोवर आम्ही त्यांचे वाटत नाही तोवर झटत राहतो, हे प्रत्येक गावात व्हायला पाहिजे असे अण्णा म्हणाले.
हजारे यांनी एकीकडे पंत प्रधान मोदीभ्रष्टाचार मुक्त भारत असा दावा करतात तर दुसरीकडे जण लोकपालची अंमल बजावणी करण्यास दिरंगाई करतात यावर त्यांची भूमिका दुटप्पी आहे अशी टीका केली.जन लोकपाल मध्ये ज्या जाचक अटी काढण्यात आलाय आहेत त्या सामील करा या साठी २३ रोजी दिल्लीत उपोषण करणार असल्याचे देखील ते म्हणाले. केंद्रातलं मोदी सरकार शेतकरी विरोधी असून गेल्या २२ वर्षात १ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत उद्योगपतींची कर्ज माफ होतात मात्र शेतकऱ्यांची कर्ज सरकार आधी माफ करणार असा प्रश्न उपस्थित करत ६० वर्ष झालेल्या शेतकऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजेत पिकाला हमी भाव मिळाला पाहिजेत असंही म्हणाले.