आजची राशी ” सिंह”
(राशीस्वामी- रवि)
|| सोनेरी किरणांचे वर्ष || राशी वैशिष्ट्ये
मिथुन ही कालपुरुष कुंडलीतील पाचव्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी रवि आहे. पूर्वेला याचे स्वामित्व असते.ही राशी राज राशीही समजली जाते. या राशीच्या व्यक्ती महत्वाकांक्षी, उच्चाभिलाषी, उदारमतवादी, दिसायला आकर्षक, रुंद खांद्याचे, चेहऱ्यावर तेज असणारे असतात. साहसी व बलशाली असतात. यांच्यात पराक्रम व निर्भीडपणा असतो. कठीणातील कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची धम्मक असते. आत्मविश्वास भरपूर असतो त्यामुळे सहसा यांचे निर्णय चुकत नाहीत.
स्वभाव वैशिष्ट्ये
रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे मित्रपरिवारात प्रिय असतात. या राशीच्या स्त्रिया थोड्या पुरुषी बाण्याच्या असतात. त्या कर्तव्य प्रधान, घर चालवण्याची आणि कुटूंबाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडतात. परंतु स्वाभिमानी वृत्तीच्या असतात. चारित्र्यवान, शीलवान, कष्टाळू असतात. या राशीच्या व्यक्ती आस्तिक असतात. देवावर विश्वास असतो, मात्र अंधश्रद्धाळू मात्र नसतात.
या राशीच्या व्यक्ती शक्यतो सरकारी क्षेत्रात विशेष करून राजकारणात दिसून येतात. यांना प्रतिनिधित्व करायला आवडते. समाजप्रिय असतात. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय क्षेत्र, मोठमोठ्या क्षेत्रात हे विशेष दिसून येतात.तसेच पोलीस सारख्या खात्यातही दिसून येतात. आशा खात्यात उच्छपदाधिकारी असू शकतात.
या राशीच्या व्यक्तींना शक्यतो हाडाचे, पॅथीव्ह कान व मज्जा तंतूंचे आजार उद्भवू शकतात. छातीत दुखणे, जलद श्वासोस्वास, तोल जाणे, ज्वर येणे, हृदयासंबंधी आजार होऊ शकतात.
वार्षिक ग्रहमान
तरुण तरुणींना हे वर्ष सोनेरी किरणांचे असणार आहे. यावर्षी ज्यांचे विवाह जुळले नसतील त्यांचे विवाह होण्याचे योग आहेत. विविध प्रकारे लाभ आपणास संभवतात.जानेवारी, फेब्रुवारी हे महिने आपणास चांगले राहतील. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. किरकोळ प्रकारच्या समस्या असल्या तरी आपण योग्य रीतीने हाताळाल. विध्यार्थी वर्गाला याकाळात चांगले मित्र मैत्रिणी भेटतील.स्पर्धात्मक गोष्टींमध्ये विजयी व्हाल, तसेच महिलांना नवीन मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. बंधुभागिनींचे सौख्य वाढेल, त्यांच्याबद्दल शुभवार्ता कळतील.
३१ जानेवारीला होणारे चंद्रग्रहण आपल्या राशीला शुभ फलदायी राहणार आहे. त्यामुळे याकाळात सरकारी कामात यश मिळेल. त्यासंबंधीचे निकाल आपल्या बाजूने लागू शकतील.चिंता करण्याचे कारण नाही.
मार्च व एप्रिल हा काळ आपल्याला थोडा मध्यम राहील. व्यापारी वर्गाला नोकर वर्गाकडून त्रास होईल. नवीन नोकर ठेवताना विचार करावा. महिलावर्गाने प्रकृतीची काळजी घ्यावी. याकाळात आपणास गुडघे दुखी, पाठ दुखी सारखे आजार डोके वर काढू शकतात. विध्यार्थी वर्गाने याकाळात अभ्यासाकडे विशेष लक्ष्य ध्यावे.कारण याकाळात केलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला पुढे चांगले मिळणार आहे, यामुळे प्रयत्न करा यश तुम्हाला नक्की मिळेल. महिलांनी याकाळात खर्चावर नियंत्रण ठेवावे.
मे व जुन या महिन्यात नोकरीमध्ये असणाऱ्याना प्रमोशनचे योग आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल किंवा वेतनवाढ होऊ शकेल. हा काळ आरोग्याच्या दृष्टीने मध्यम फलदायी राहील. वर्षाच्या सुरुवातीला अचानक प्रकृतीत बिघाड जाणवेल, त्यामुळे हा महिना शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने प्रतिकूल राहील. वरश्याच्या सुरुवातीला व्यापारी वर्गाने केलेली गुंतवणूक या महिन्यात फलप्रद राहील.
विध्यार्थी दशेतील मुले जी तांत्रिक, विज्ञान क्षेत्रातील आहेत, त्यांना मणिवांछित ठिकाणी काम करण्याची संधी प्राप्त होईल. नवविवाहितांना अपत्य प्राप्तीचे योग येतील.
जुलै, ऑगस्ट या महिन्यात वयस्कर मंडळींनी तसेच ज्यांना पाठीचे विकार आहेत त्यांनी काळजी घ्यावी. महिला व मुलांना कौटुंबिक सहलीचा आनंद घेता येईल. याकाळात घरातील वातावरण प्रसन्न राहील.
तरुण तरुणींनी याकाळात प्रेमप्रकरणे हाताळताना काळजी घ्यावी, फसवणुकीचे किंवा अपयशाचे योग्य संभवतात. विवाहात अडचणी किंवा बोलणी फिस्कटण्याचे योग्य आहेत.वडीलधाऱ्यांची काळजी घ्यावी.
सप्टेंबर , ऑक्टोबर हा काळ नोकरदार वर्ग अथवा विध्यार्थ्यांना प्रदेश गमनाचे योग देऊन जाईल. इतरांना तिर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील, अनेक धार्मिक कृत्ये घडतील. ३१ जुलै च्या ग्रहणा नंतर दोन महिन्याचा काळ शुभगोष्टी घडवून आणले, या वर्षातील दोन ग्रहणे सिंह राशीला शुभप्रद राहतील.
नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात स्त्रियांनी समजूतदारपणे वागावे. गृहसौख्याच्या दृष्टीने हा काळ मध्यमफलदायी राहील, पैशांची चणचण जाणवेल. डिसेंबर मध्ये फळे, धान्य,जनावरे यांच्या व्यापार्यांना फायदा होईल.. नवीन मिळकत खरेदीचे योग आहेत, परदेशगमन व वास्तव्याच्या संधी येतील.
काही महत्वाचे
# सिंह राशीतील नक्षत्रे: मघा, पूर्वा, उत्तरा
# मघा स्वभाव : धार्मिक, नीतिमान नाम अक्षर : मा, मी, मु, ते
# पूर्वा स्वभाव :विलासी,ऐश्वर्यवान नाम अक्षर : मो, टा, टी, टू
#उत्तरा स्वभाव : मितभाषी, कलाप्रेमी, नाम अक्षर: ट
उपासना
# मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी गूळ, मीठ दान करावे. तसेच पीतरांची सेवा करावी. कावळ्यांना जेवण, मुंग्यांना साखर घालावी. पितृतुष्टी वाचावी
# पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी शिजलेले अन्न, दहीभात दान करावे. पळसाची पूजा करावी.सुर्यष्टक स्तोत्र वाचावे
#उत्तरा नक्षत्राच्या श्वेत वस्तू, मोती दान करावे गायीला गूळ दान करावे.दत्त बावन्न वाचावी
# भाग्यरत्न राशीप्रमाणे माणिक
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
# शुभवार : रविवार,सोमवार, गुरुवार
# शुभमहिने : एप्रिल, मे, ऑक्टोबर, डिसेंबर
#रंग : सोनेरी,गुलाबी
NiCe