बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्त पदी डी आय जी डॉ डी सी राजप्पा यांनी पदभार स्वीकारला आहे गुरुवारी सकाळी डी सी पी सीमा लाटकर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकार केला.
गेल्या महिन्या भरापासून पोलीस आयुक्त टी जी कृष्ण भट्ट यांच्या निवृत्ती नंतर पोलीस आयुक्त पद रिक्त होते या ठिकाणी राजप्पा यांची वर्णी लागली आहे. बेळगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठी कठोर पावल उचालली जातील अस ते म्हणाले. यावेळी वरिष्ठ अधिकऱ्यांची त्यांनी बैठक घेतली त्यात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल