पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागतो तरी द हिंदू वर्तमान पत्राच्या म्हणण्या नुसार राज्यात बेळगावात पासपोर्ट वेरिफिकेशनच्या अनेक केस प्रलंबित आहेत यात बेळगाव आघाडीवर आहे .
बेळगावात पास पोर्ट वेरिफिकेशनच्या १० ७२ तर तुमकुरू मध्ये ८८०, गुलबर्गा मध्ये ७८१ तर हुबळीत ५७१ केस प्रलंबित आहेत . बंगळुरू ही राज्यातल मोठं शहर असून देखील तिथे पोलिसांच्या कर्तबगारीची चुणूक दिसून आली आहे पासपोर्ट वेरिफिकेशनची कोणतीही केस प्रलंबित नाही त्या खालोखाल बागलकोट पोलिसांनी देखील चांगली कामगिरी बजावली आहे . एकूण २१ दिवसांच्या कालावधीत बंगळुरू पोलीस १२ दिवसात हे व्हेरिफिकेशन पूर्ण करतात म्हणूनच बंगळुरू शहरात एकही केस प्रलंबित नाही .
बंगळुरू शहर पोलीस पासपोर्ट कार्यालयाने दिलेल्या माहिती नुसार कोणतेच केस प्रलंबित ठेवत नाही .या पासपोर्ट व्हेरिफिकेशन मध्ये बेळगाव राज्यात आघाडीवर असल्याने बेळगावातील पोलीस कर्मचारी कामचुकार बनले आहेत हे सिद्ध होतंय