बेळगाव महा पालिका आयक्त शशिधर कुरेर हे काँग्रेसचे एजंट असल्यासारखे वागत आहेत. 9 कोटी रूपयांच्या विकास कामांबाबत त्यांनी एकदाही मला विचारले नाही. माझा फोन उचलला नाही. त्यामुळे या निधीबाबत त्यांनी आणि पालकमंत्री जारकीहोळी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावीय अन्यथा त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा देत भाजप आमदार संजय पाटील यांनी महा पालिकेवर मोर्चा काढत आंदोलन करत लक्ष्मी हेब्बाळकर आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा निषेध केला.
हेब्बाळकर कडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न –
शंभर कोटी निधीच्या विनीमयासाठी शहरातील सर्व आमदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांची संयुक्त समिती आहे. पण बेळगाव ग्रामीण मतदार संघात या निधीतून कामे करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सांगण्यावरुन पालकमंत्री जारकीहोळी आणि आयुक्त कुरेर यांनी 9 कोटी रूपयांचा निधी खर्च करण्याचा आणि त्याचे श्रेय हेब्बाळकर यांना देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मुख्यमंत्री निधीतून मिळालेल्या शंभर कोटी रूपयांतून ग्रामीण मतदार संघात 9 कोटी रूपयांचे काम लक्ष्मी हेब्बाळकर, पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि आयुक्त शशिधर कुरेर यांनी सुरू केले आहे. हे काम करताना कोणतीही आचारसंहिता पाळण्यात आली असून आपण आमदार नसूनही जाणीवपूर्वक राजकारण करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडणार असणार असल्याचे देखील संजय पाटील म्हणाले .
Trending Now
yes sir commissioner is corrupt