भाजप आमदार संजय पाटील पालिकेसमोर कोणत्या कारणाने आंदोलन करताहेत असा प्रती प्रश्न करत आगामी निवडणुकीच्या तोंडावर नऊ वर्षांच्या कुंभकर्णाचा झोपेतून आता जागे झालेत का अशी टीका राज्य प्रदेश काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे.
बॉकसाईट रोड येथील सिद्धेश्वर वसाहतीत विविध विकास कामांना चालना दिल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. मागील दोन टर्म मध्ये झोपी गेलेले संजय पाटील काँग्रेस पक्षावर अनाठायी टीका करत असून सध्या मतदार हुशार आहे . स्मार्ट सिटीच्य १०० कोटी अनुदान पैकी शहरालगतच्या ग्रामीण भागात ९ कोटी अनुदान मंजूर केल्याचं देखील त्या म्हणाल्या . मागील निवडणुकीत या मतदार संघात मला देखील मत पडली आहेत त्यामुळे माझी जबाबदारी म्हणून मी कार्य करत आहे असं देखील स्पष्ट केलंय