कर्नाटक आपल्या हातचं निष्ठून जातंय अशी भीती आता केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या मनामध्ये ही भीती घर करून राहिली आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात भाजपचे 150 प्लस मिशन यशस्वी करण्यासाठी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपली पूर्ण प्रतिष्ठा पणास लावली आहे त्यांच्या कर्नाटक वाऱ्या वाढल्या आहेत.
राज्यातील भाजपची स्थिती ही नाजूक असल्याचं त्यांना मनोमनी पटलं आहे त्यामुळेच की काय अलीकडेच अमित शाह यांनी कर्नाटकातील भाजप खासदार व आमदार यांची संयुक्त बैठक बोलावून या बैठकीत राज्यातील नेत्यांच्या कानपिचक्या केल्या आहेत.
राज्य भाजपातील येडीयुरप्पा,ईशवरप्पा यांचे मतभेदही कायम आहेत जिल्ह्या जिल्ह्यातील भाजप संघटनेत भाजप केजीपी असे दोन गट निर्माण झाले आहेत राज्य भाजपच्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यात समानव्याचा अभाव असल्याने राज्यातील भाजपची स्थिती ‘ए शिप विथआऊट रडार’ अशीच झाली आहे.
अमित शाह यांनी विविध जिल्ह्यांचा पक्षाच्या स्थिती चा आढावा घेतला असता उपस्थिता कडून समर्पक उत्तर मिळाले नाही त्यामुळं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.आपण दिलेल्या आदेशाचे पालन करावे असा स्पष्ट आदेश उपस्थितांना दिला.प्रत्येकाला दिलेली जबाबदारी एक तर व्यवस्थित पार पाडवी न होऊन ते काम आपण करण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सुनावले त्यामुळं त्यांनी उपस्थित खासदारांची डोके दुःखी वाढली आहे.
येत्या विधान सभा निवडणुकीतील तिकीट वाटपाचा जे काम आहे ते आपण स्वतः करणार असून त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप चालून घेतला जाणार नाही त्यामुळे राज्यातील असंख्य आजी माजी आमदारांच्यात आपल्याला तिकीट मिळेल याची खात्री न राहिल्याने ते त्रस्त झाले आहेत एकूणच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी विधान सभा निवडणुकीत उत्तर प्रदेशाचा मॉडेल यशस्वी करण्याचा निर्धार केला असून कर्नाटकात त्याला कितपत यश मिळेल याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.खुद्द एका भाजप खासदारानेच उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याची तुलना कर्नाटका बरोबर करता येणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Trending Now