आजची राशी ” कर्क”
(राशीस्वामी- चंद्र)
|| शत्रूवर विजय मिळवाल ||
राशी वैशिष्ट्ये
मिथुन ही कालपुरुष कुंडलीतील चतुर्थ क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी चंद्र आहे. ही चर राशी व स्त्री राशी असून जलतत्वाची रास आहे. यामुळे साहजिकच या राशीच्या व्यक्तीमध्ये हळवेपणा दिसून येतो . चंद्रासारख्या कोमल हृदयाच्या पण चंचल स्वभावाच्या प्रेमळ व्यक्ती या राशीत आपल्याला दिसून येतात.
स्वभाव वैशिष्ट्ये
या राशीच्या स्त्रिया संसार उत्तमप्रकारे करतात. म्हणजेच गृहकर्त्यव्यदक्ष धार्मिक आणि विविध काळातून असणाऱ्या असतात. यांना स्वयंपाकाची विशेष आवड दिसून येते. येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत उत्तम प्रकारे करतात, त्यातच त्यांना आनंद मिळतो.
या राशीचे पुरुषही दयाळू अंतकरणाचे असतात. परंतु हे लोक आपल्या निर्णयावर ठाम असतात. एकाधी गोष्ट ठरवली की ती करूनच गप्प बसतात. या राशीच्या स्त्रिया एक उत्तम गृहिणी म्हणून ओळखल्या जातात. या स्त्रिया दिसण्यास आकर्षक असतात.
या राशीचे लोक विशेष करून पांढऱ्या वस्तूचा व्यापार, पातळ पदार्थ, गृहोपयोगी वस्तूंचा व्यापार, किंवा कंपन्या, चांदी, दुधाचे पदार्थ,फळे, भाज्या, आयुर्वेद, मानसरोग, हॉटेल व्यवसाय यासारख्या क्षेत्रात नोकरी धंद्यात असतात.
या लोकांना विशेष करून अपचन, पित्त, निद्रानाश, कंबर तसेच मणक्या संबंधी आजार होतात.जानेवारी, फेब्रुवारी महिने कर्क राशीला बरे जातील. जानेवारीच्या पूर्वार्धात महत्वाची कामे करून घ्यावीत.केलेल्या कामाचे योग्य फळ आपणास मिळेल. कारण ३१ जानेवारीला होणारे चंद्रग्रहण आपणास अनुकूल नाही. लग्नायोग्य मुलामुलींचे लग्न जमविण्याचे प्रयत्न या काळात यशस्वी होतील. त्यादृष्टीने प्रयत्न चालू ठेवावे. स्त्रियांनी याकाळात प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गरोदर स्त्रियानी याकाळात प्रकृतीची काळजी घ्यावी.तरुण मुलींना मासिक धर्माविषयीचे आजार उद्भवतील. विध्यार्थी वर्गास स्पर्धा परीक्षेत बक्षिसे मिळण्याचे योग आहेत.
मार्च व एप्रिल महिन्यात आपल्या भाग्यात रवी बुध व शुक्र हे ग्रह येत आहेत.यामुळे व्यापारीवर्ग तसेच स्त्री वर्ग आणि तरुणांना उत्तम असा कालखंड आहे. याकाळात स्त्रियांना आपले कला गुण सादर करण्याची संधी मिळेल. तसेच तरुण तरुणींना काहीतरी नवीन शिकण्याची संधी उपलब्ध होईल. शुक्रामुळे बुधाचा निचभंग होईल, एखाद्या मैदानी खेळात मुले उत्कर्ष करतील.
नोकरीमध्ये असणाऱ्यांना या महिन्यात आर्थिक लाभ होतील. परंतु या महिन्यात गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. परंतु आपण या शत्रूचा बिमोड करून त्यावर विजय मिळवाल.
मे व जुने महिना व कालखंड आपल्याला स्मरणीय वाटेल. कोर्ट कचेरी मध्ये प्रकरण असणाऱ्यांची कामे निकाली लागतील, यात विजय आपलाच होईल. उत्तम काळ असल्याने घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. व्यापारात कितीही अडचणी आल्यातरी आपण त्यातून योग्य मार्ग काढाल. या काळात महिलांनी शांत राहावे. घरातील वयस्कर व्यक्तींशी वादविवाद करू नये, तरुणांनी जबाबदारी ने वागावे, याकाळात अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.स्त्रियांनी अनावश्यक खर्च टाळावा.
जुलै, ऑगस्ट या महिन्यापैकी जुलै महिन्याच्या सुरुवातीला थोडे वादाचे प्रसंग आणिल, राशीत बुध असल्याने आपण मनावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. फटकळ पणे बोलणे यामुळे भावंडा सोबत मतभेदाचे प्रसंग येतील, जोडीदारासोबत गैरसमज निर्माण होतील.तसेच उपवरांचे विवाह जमण्यात अडथळे येतील. आर्थिक व्यवहारात मात्र व्यापारी वर्गाला लाभ होईल. २७-२८ ऑगस्ट चे ग्रहण आपल्याला संमिश्र फळे देईल.
सप्टेंबर , ऑक्टोबर हा काळ विचित्र आजार डोके वर काढायला लावणारा आहे. याकाळात अस्वस्थता जाणवेल, त्यामुळे मित्रमंडळींचे सहकार्य घ्याल, आपण कुटुंबासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न कराल. घरात धार्मिक कार्ये होतील. घरात एखाद्या नवीन व्यक्तीचे आगमन होईल. संतती विषयक चांगली बातमी कानावर येईल.
नोव्हेंबर, डिसेंबर हा काळ खऱ्या अर्थाने आपल्या कष्टाचे सोने करेल. याकाळात कोर्ट संबंधीचे अर्धवट राहिलेले निकाल मार्गी लागतील. पंचमातील रवी, बुध, गुरू हे योग्य संतती योग देतील. विध्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या हा कालखंड चांगला आहे. रवी बुध गुरुची लाभावर दृष्टी सर्व प्रकारचे लाभ मिळवून देईल, हातून दानधर्म घडेल. नोकरी नसणाऱ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. विवाह होतील किंवा जमतील. घरातील व्यक्तींचे सहकार्य उत्तम लाभेल. परंतु याकाळात जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
काही महत्वाचे
# कर्क राशीतील नक्षत्रे: पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा
# पुनर्वसू स्वभाव : सरळ, सौम्य नाम अक्षर :ही
# पुष्य स्वभाव :धनाढ्य, बुद्धिमान नाम अक्षर : हु, हे, हो, हा
# आश्लेषा स्वभाव : क्रोधी, बहुभाषि: डी, डु, डे, डा
उपासना
# पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी वेळूची पूजा करावी तीळ दान करावे. तसेच शंकराची सेवा करावी. शिवलीलामृताचे, ११ व्य अध्यायाचे पठण करावे.
# पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी पिंपळ वृक्षाचे पूजन करावे, लाल वस्त्र दान करावे.दत्ताची सेवा करावी व दत्त बावन्नी वाचावी
#आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी मूग दान करावे तसेच विष्णुपूजा करावी.व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करावा
* महिलांनी दुर्गास्तोत्र पठण करावे.
* विध्यार्थीवर्गाने सरस्वती मंत्राचा जप करावा, विध्येत यश मिळेल.
* वयस्कर व्यक्तींनी दत्ताय साक्षात्काराय नमः जप करावा.
# भाग्यरत्न राशीप्रमाणे मोती
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
# शुभवार : सोमवार, मंगळवार, गुरुवार
# शुभमहिने : एप्रिल, मे, ऑक्टोबर, डिसेंबर
#रंग : पोपटी, केशरी
( भाग्योदय वयाच्या २५ ते ३७ या काळात होईल)