कंग्राळी खुर्द येथे मागील अनेक दिवसांपासून बेकायदेशीररित्या वाळू फिल्टर करण्यात येत आहे, मात्र याकडे पोलीस व प्रदूषण महामंडळाने दुर्लक्ष केले आहे, याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. या फिल्टर प्लॅन्ट मुळे गाव आणि परिसरात प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.
राजगोळी येथून बेकायदा वाळू वाहतूक करण्यात येते , काही दिवसांपूर्वी अगसगा येथे ट्रक अडवून याला विरोध करण्यात आला होता , यानंतर या मार्गावरून ही वाहतूक बंद करून कडोली मार्गे सुरू करण्यात आली होती मात्र येथेही विरोध झाला,
काही दिवसांपूर्वी पोलीस व प्रदूषण महामंडळाने कारवाई करून बेकायदा होणारी वाळू वाहतूक व फिल्टर करणाऱ्या केंद्रावर छापा टाकून कारवाई केली, त्यानंतर काही दिवस हे बंद करण्यात आले, मात्र आता पुन्हा सुरू झाले आहे,
या रस्त्यावरून ये जा करणार्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, महत्वाचे म्हणजे मार्कंडेय नदीत प्रदूषित पाणी मिसळले जात आहे, परिणामी शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.
याचा विचार करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.