आय पी एस डॉ डी सी राजप्पा हे आहेत बेळगावचे नवे पोलीस कमिशनर. या पदावरील कृष्णभट्ट यांच्या निवृत्तीनंतर पूर्णवेळ कमिशनर प्राप्त झाले आहेत.
ते लवकरच चार्ज घेणार आहेत. त्यांनी दैनंदिन जीवनावर आधारित ३०० कविता केल्यात. कॉलेज मध्ये असताना पासून त्यांना ही आवड आहे.बेळगावला कर्नाटक सरकारने कवी मनाचे कमिशनर दिले आहेत.लवकरच ते आपला पदभार स्वीकारणार आहेत .
राज्यात कायदा जाणकार असलेले ,पोलीस मित्र असलेले अधिकारी आहेत. लोकांच्या समस्या समजून जाणून घेऊन थेट जनतेशी जोडले गेलेलेअधिकारी म्हणून परिचित आहेत. ते एक ख्यात कवी असून आपल्या पोलिसी अनुभवातून कविता लिहित पोलिसांचा मनोधैर्य वाढवलं आहे.