Thursday, January 9, 2025

/

वार्षिक राशिभविष्य २०१८ – राशी ” मेष “

 belgaum
आजची राशी ” मेष “
(राशीस्वामी- मंगळ)
|| धीरा पोटी फळे गोमटी ||
राशी वैशिष्ट्ये
मेष ही कालपुरुष कुंडलीतील प्रथमस्थानी असणारी राशी आहे. या राशीचा अंमल मुख्यत्वेकरून मस्तकावर असतो.ही चर राशी असून अग्नितत्वाची व पूर्व दिशेवर प्रभुत्व असणारी असते. ही राशी विषमराशी असून क्रूर राशी आहे. क्रूरता, सोशिकपणा, निष्टुरता, धाडस, साहसी, अहंकार, निर्भयता, कर्तृत्व, स्वावलंबित्व, कष्टाळू तसेच दुसऱ्यांवर हुकूम गाजवणे यांना आवडते.
स्वभाव वैशिष्ट्ये
मेष राशी चर स्वभावाची असल्याने चंचलपणा, अस्थिरता व घाईगडबडीत काम करणे, व्यवसाय नोकरीत वारंवार बदल करणे असे गुण या राशीच्या माणसात दिसून येतात.यामुळे बऱ्याचदा योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. स्वतःचे नुकसान करून घेतात. प्रवासाची विशेष आवड दिसून येते. अग्नीतत्व हा या राशीचा मुख्य गुणधर्म असल्याने यांची पित्तप्रकृती असते. यांना उन्हाळा सहन होत नाही तसेच उष्णतेचे विकार, डोळ्यांची जळजळ व डोक्यासंबंधी विकार होतात. याच अग्नितत्वाने राग चटकन येतो, स्वभावाने मोकळे आणि स्पष्ट बोलणारे लोक या राशीत आढळतात. घरातील व्यक्तींशी यांचे विशेष जमत नाही परंतु समाजात यांना मोठा मान असतो. परिश्रम करण्याची वृत्ती असल्याने स्वकष्टाने व पराक्रमाने पुढे येतात. दृढ संकल्पशक्तीमुळे आपले काम अडचणींवर मात करून पूर्ण करतात. धार्मिक तसेच शोधकवृत्ती दिसून येते. ज्योतिषशास्त्राची आवड असते.साहसी कामे म्हणजे सैन्यदल, पोलिसखाते तसेच अग्निसंबंधीत व्यवसायाशी व विद्युतसंबंधी खात्यासंदर्भात नोकरी किंवा व्यवसायात हे लोक आढळून येतात. किंवा या व्यावसायांशी त्यांचा जास्त संबंध येतो.
spaoncer rashi bhavishya 1
वार्षिक ग्रहमान
या वर्षी गतवर्षी केलेल्या कष्टाचे फळ नक्की मिळेल. पण त्यासाठी थोडा धीर धरावा लागेल.जानेवारी महिन्यात मित्र- मैत्रिणींकडून सहकार्य लाभेल, मानसन्मान मिळेल, चैनीवर खर्च कराल. वर्षाची सुरुवात जरी सामान्य असली तरी मार्च नंतर अनुकूल परिस्थिती जाणवेल. जानेवारीत नोकरी व्यवसायात चढ उतार होईल,स्वास्थ्य नरमगरम राहील तसेच कुटुंबात वडिलोपार्जित मालमत्ता असल्यास त्याबद्दल वाद किंवा गैरसमज निर्माण होतील, निर्णयांना व्हिलन होऊ शकेल, व्यवसाय संबंधी निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
३१ जानेवारीला होणारे खग्रास चंद्रग्रहण आपल्या राशीला थोडे प्रतिकूल असल्याने त्याचे परिणाम पुढील दोन महिन्यांपर्यंत दिसून येतील, त्यामुळे फेब्रुवारी व मार्च हे महिने आपण आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डोक्यासंबंधी विकार तसेच व्यवसाय भागीदाराशी वादाचे प्रसंग तसेच कुटुंबात अस्थिरता वाटेल. परंतु दैवी उपासना केल्यास त्याची तीव्रता कमी होईल, याकाळात आपण विशेष उपासना करावी फळ चांगले मिळेल.
मार्च नंतरचा काळ अनुकूल राहील. म्हणजेच सुरुवात सामान्य  असली तरी नंतरचा काळ अनुकूल राहील त्यासाठीच जानेवारी ते मार्च हा काळ धीराने हाताळावा लागेल.” धीरा पोटी फळे रसाळ गोमटी” याचे प्रत्यंतर दिसून येईल.घरी काही शुभकार्ये घडतील, नोकरी व्यवसायात एकाधी चांगली संधी चालून येईल, किंवा बदल घडून येतील.त्यातून फायदा होईल. कुटुंबासमवेत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल किंवा त्यासंदर्भात दूरचे प्रवास घडतील. नवदांपत्यांना संतान प्राप्तीचा आनंद घेता येईल तसेच एप्रिल महिन्यात एखादी उत्कर्षकारक घटना घडेल. अमावस्येजवळचा काळ अनुकूलता दर्शवतो.
मे व जून महिन्यात वाहन व वास्तुयोग येईल तसेच एखाद्या प्रियव्यक्तिविषयी चांगली बातमी मिळेल अथवा भेट होईल. जून महिन्याच्या अमावास्येजवळ विचित्र आजार डोके वर काढतील त्यामुळे खाण्यापिण्यावर समतोल राखणे गरजेचे आहे.
जुलै व ऑगस्ट महिन्यात आपण केलेल्या कामाचे योग्य फळ मिळाल्याचे समाधान होईल.घरात आनंददायी व प्रसन्न वातावरण राहील.मुलांकडून उत्कर्षाचे काम होईल. विध्यार्थीवर्गाने या काळात शिक्षणाकडे, अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. महिलांनी याकाळात प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल.
सप्टेंबर व ऑक्टोबर हा महिना व्यवसायात जरी यश देणारा असला तरी पैशांचा अपव्यय होईल यामुळे याकाळात खर्चाचे नियमन करावे लागेल. याकाळात केलेली बचत पुढील दोन महिन्यात आपणास उपयोगी पडेल.
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या स्वास्थ्यासंबंधी खर्च होतील. या महिन्यातील पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात कालखंड यशदायी जाईल.नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल , सरकारी कामात यश मिळेल, एकाधे वाहन खरेदीचा योग्य येईल. कलाकार व संगीत क्षेत्राशी संबंधीत व्यक्तींना नवीन संधी खुणावतील. महत्वाचे निर्णय वर्षाअखेरीस संपुष्टात येतील त्यामुळे आपणास मानसिक स्वास्थ्य लाभेल.
काही महत्वाचे
# मेष राशीतील नक्षत्रे: अश्विनी, भरणी आणि कृतिका
# अश्विनी स्वभाव : तीक्ष्ण, चतुर,  नाम अक्षर : चू, चे, चो,ला
# भरणी स्वभाव : निष्टुर, चंचल, नाम अक्षर : ली, ले, लू, लो
# कृतिका स्वभाव : क्रोधी, स्त्री आकर्षण, नाम अक्षर : अ
उपासना : गणपती,मारुती, कुलदेवतेची( विशेष करून मंगळवारी)
# अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी अन्नदान करावे, भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी वस्त्रदान करावे, कृतिका नक्षत्र असणाऱ्यांनी सुवर्णदान किंवा सुवर्णवर्णाच्या वस्तूंचे दान करावे.
* पुरुषांनी महत्वाच्या कामाला जाताना लालवस्त्र (रुमाल) आपल्या जवळ ठेवावे.
* महिलांनी महत्वाच्या कामाला जाताना लाल गुंजा जवळ ठेवाव्या कामात यश येईल, स्त्रियांनी नित्य मंगळवारी कुंजीका स्तोत्राचा पाठ करावा, कुटुंबात शांतता लाभेल.
* विध्यार्थीवर्गाने विशेष करून गणपती अथर्वशीर्ष नित्य पठण करावे. कमीतकमी मंगळवारी तरी करावेच. परीक्षेला जाताना गणपतीला लाल फुल, गुळखोबरे अर्पण करावे.यश येईल.
* वयस्कर व्यक्तींनी मंगळवारी मारुती उपासना केल्यास लाभ येईल, मंगळवारी मारुतीला मोतीचूरचे लाडू अर्पण करून हनुमान चालीसा वाचावी
# भाग्यरत्न राशीप्रमाणे पोवळे
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रतन धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
अंकशास्त्रानुसार ९ अंक मंगळाचा असल्याने भाग्यांक ९ असणाऱ्यांनी वरील उपासना करता येईल.
# शुभवार : मंगळवार, गुरुवार, शुक्रवार
# शुभमहिने : जानेवारी, मार्च, एप्रिल, जुलै, सप्टेंबर
#रंग : तांबडा, नारिंगी,गुलाबी
( भाग्योदय वयाच्या सत्तावीस वर्षांपासून)

 

श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय
सौ. उषा सुभेदार, ज्योतिषी

padmamba,घर क्रं २०१६,बी -२ कोरे गल्ली शहापूर
बेळगाव -५९०००३.- फोन ०८३१-२४६४६३६
मोबा. ८७६२६ ५५७९२- ८६१८०७३३२८

 belgaum

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.