मराठी आहे मराठीच राहणार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा चैत्रमास गुढी पाडव्यालाच देणार हा संदेश देत शिवप्रेमी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डी जे डान्स पार्टी,नशा याला फाटा देत निराधार महिलांना जेवण साडी चोळी भेट देत अनोख्या पद्धतीने वर्षाचा शेवट केला आहे.
३१ डिसेंबर च्या रात्री पार्टी करून मौज मजा मस्ती नाश करण्याऐवजी त्याच पैशांचा सदुपयोग कसा करता येईल याचं उत्तम उदाहरण या युवकांनी समाजासमोर ठेवले आहे. खडे बाजार, फोर्ट रोड ,भाजी मार्केट पी बी रोड भागात रस्त्यावर फिरणाऱ्या निराश्रित १२ वृद्ध महिलांना शोधून त्यांचा साडी चोळी जेवण सत्कार करत नवीन वर्ष साजरं केलं आहे .
आम्ही गुडी पाडव्यालाचा नवीन वर्ष मराठी पद्धतीने साजर करतो मात्र आजचे युवक पाश्चात्य पद्धतीने नवीन वर्ष साजर करून देशी हिंदू संस्कृती नुकसान करत आहेत त्यामुळे युवकांना एक बोध देण्यासाठी म्हणून आम्ही हा विधायक उपक्रम केला असल्याची माहिती मेघन लंगरकांडे यांनी बेळगाव live शी बोलताना दिली. यावेळी शिवप्रेमी युवक मंडळाचे संतोष कणेरी, ईश्वर मासेकर परशराम कलघटकर,राजू हावळ तुकाराम बर्डे,सतीश गावडोजी, हरजीत सिंह,ईश्वर सिंह यांनी देखील सहभाग घेतला होता.