केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या वक्तव्याने देशाची एकतेला धक्का बसलाय असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करत राजीनामा घ्या या मागणी साठी बेळगाव कॉंग्रेसने जोरदार निदर्शन केली आहेत.
देशाची राज्यघटना बदलायलाच आम्ही आहोत असे वक्तव्य केंद्रीय मंत्री हेगडे यांनी केली होती कालच त्यांनी या विषयावर संसदेत दिलगिरी व्यक्त करत माफी देखील मागितली होती. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी क्लब रोड वरून मिरवणूक काढत चन्नमा चौकात निदर्शन केली आणि हेगडे यांचा पुतळा जाळला.
जिल्हाधिकारी एस जिया उल्ला द्वारा राष्ट्रपतीना दिलेल्या निवद्नात भाजप नेत्यांनी हेगडे यांच्या जिभेवर लगाम घालण्यात अपयश आले असून त्यांच्या वक्तव्यांनी भारताच्या अखंडतेला धक्का पोचला आहे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. बेळगाव जिल्हा ग्रामीण कॉग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्या सह अनेक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यानी या मोर्चात सहभाग दर्शवला होता.