6जून 1986 रोजी बेळगावात झालेल्या कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्मे पत्करले बेळगुंदी येथील भावकू चव्हाण, कल्लाप्पा उचगावकर यांच्या वारसांना बंद झालेली पेन्शन पूर्ववत करा अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यापासून शासनाकडून दर महा दहा हजार रुपये मिळणारी पेन्शन बंद झालेली असून ती सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.शुक्रवारी दुपारी कोल्हापूर मुक्कामी माजी आमदार बी आय पाटील यांच्या नेतृत्वात समितीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर चे अप्पर जिल्हाधिकारी काटकर ,अरविंद लाटकर यांची भेट घेऊन वरील मागणी केली आहे.
बेळगुंदि येथील आंदोलनातील हुतात्म्यांच्या पत्नी शांता भावकू चव्हाण,रेणुका यल्लप्पा उचगावकर यांना गेले चार महिने महाराष्ट्र शासनाकडून मिळणारी पेन्शन बंद झाली आहे. या हुतात्म्यांना1999 ला महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्य सैनिक हा दर्जा दिला आहे त्यामुळे सुरू असलेली पेन्शन अचानक बंद झाल्याने कुटुंबाची परवड होत आहे लवकर पेन्शन सुरू करा अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी मनोज पावशे शटूप्पा चव्हाण,जोतिबा उचगावकर,संजय पाटील उपस्थित होते.
Trending Now