राकसकोप चे रहिवासी व कॉलेज रोड येथील यश ऑटोचे संचालक शिवप्रेमी संजय रुक्मांणा मोरे यांना राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ ( ट्रस्ट) नवी मुंबई यांच्यावतीने शिवसंत उपाधीने गौरवण्यात येणार आहे.
संजय मोरे यांनी छ शिवाजी महाराजांच्या प्रति केलेल्या कार्याची नोंद या ट्रस्टने घेतली आहे. रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या सदरेवर १ जानेवारीला सकाळी ७ वाजता ही उपाधी मान्यवरांच्या उपस्थितीत बहाल केली जाणार आहे.
संजय मोरे हे गेल्या २० वर्षांपासून कॉलेज रोडवर यश ऑटोचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.