बेळगावातील काही रेशन दुकानातून बी पी एल दारिद्र्य रेषेखालील हलक्या प्रतीचा सडक गहू वितरीत केला जात आहे त्यामुळे किडका गहू जनता खाऊ शकेल का असा प्रश्न सामान्य लोकातून विचारला जात आहे अन्न नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत विचार करावा अशी मागणी देखील केली जात आहे.
य संबंधी सामाजिक कार्यकर्ते भागोजीराव पाटील यांनी प्रत्यक्ष वाटप करण्यात येणारा गव्हाचा नमुनाच अण्णा नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्याच्या टेबलावर नेऊन ठेवला. अन्न नागरी पुरवठा खात्याच्या उपसंचालिका आफरीन बानो यांच्या निदर्शनास हा गहू आणून देत चांगल्या खाण्या लायक गव्हाचे वितरण करावे अशी मागणी केली. या तक्रारीची दाखल घेत आफरीन बानो यांनी सडका गहू वितरण बंद करण्याचे आदेश देऊन यापुढे चांगला गहू देण्याचे आश्वासन दिले.