वीज पुरवठ्यातील सावळा गोंधळ शेतकऱ्यांना त्रासदायक आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बेळगाव तालुक्यात दिवस ८ तास थ्री फेज वीज द्या, अशी मागणी तालुका म ए समितीने केली आहे.
जिल्हाधिकारी महोदयांनी याकडे लक्ष ध्यावे, अशी मागणी केली आहे. २०१४ पासून ही मागणी करण्यत येत असून उपयोग होत नाही असे निवेदनात म्हटले आहे.
गुरुवारी सकाळी तालुका समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांना निवेदन सादर केलं.यावेळी अनेक समिती नेते उपस्थित होते