बेळगावात आणि परिसरात दोन धर्मियात दगडफेक व जाळपोळीच्या हिंसात्मक घटना वारंवार होत असतात. या घटना घडवून आणणारे राक्षस वेगळे आणि एक माणुसकीचं नातं म्हणून धर्म भिंती तोडत अनेकांना मदत करण्याचं कार्य करणारे माणुसकीचे पुजारी वेगळे. वडगाव येथील बाबुल पठाण असेच धर्म आणि जातीच्या भिंतीच्या पलीकडे माणुसकीचे काम करत आलेत.
घरची स्थिती हालाखीची असलेले कारभार गल्ली येथील कृष्णा बाळेकुंद्री हे आजारी आहेत, त्यांना दवाखान्यात दाखल करण्याइतकी त्यांच्या कुटुंबियाची ऐपत नाही ,मात्र गेल्या ८ दिवसा पासून बाबुल पठाण यांनी कृष्णा यांना सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल केलं, तसेच ते स्वता होऊन त्यांच्या उपचारांचा आर्थिक भार उचलत आहेत, आणि सुश्रुषाही करत आहेत. आपल्याच घरचा सदस्य असल्याप्रमाणे ते त्यांची रोजच्या रोज काळजी घेत आहेत.
बाबुल हे विष्णू गल्ली वडगावचे रहिवासी असून बाजार गल्ली वडगावात त्याचं सायकलचं दुकान आहे .इतर व्यवसाय देखील ते करत असतात आज वयाच्या ६८ व्या वर्षी देखील ते अनेकांना जात धर्म भेद विसरून मदत करत असतात. वडगाव भागातील अनेक तंटे वाद भांडणे मिटवण्यात एक पंच म्हणून देखील ते आघाडीवर असतात. त्यामुळे वडगावात बाबुलचाचा या नावाची ख्याती आहे.जरी धर्माने मुस्लीम असले तरी जात धर्म भेद भाव न मानता ते सेवाभाव जपतंच आलेत.
अनेक गरजू लोकांना उपचारासाठी मदत करण हे त्याचं काम .आपल्या खिशातील ५० रुपये पासून १०० ,२०० पाचशे हजार जसे जमेल तसे वैदयकिय मदत ते लोकांना करत असतात. कायम मराठी लोकातून असतात कायम मराठी बोलत असतात. अनेकांना त्यांनी घर बांधण्यास मदत केली आहे कर्ज काढून दिली आहेत. मच्छे येथील यल्लापा कुरबर नावाच्या युवकास त्यांनी ६ लाख कर्ज बँकेतून मिळवून दिलंय.मागील वर्षी झालेल्या मच्छे लक्ष्मी यात्रे दरम्यान बाबुल हे यल्लापा नावाच्या युवकाच्या घरी जेवणाला गेले असता त्या युवकाच घर केवळ लहान आहे म्हणून नवीन घर बनवण्यासाठी त्यांनी आपल्या घरचे कागदपत्रे गहाण ठेऊन कर्ज मिळवून दिलंय.
आजच्या युगात कोण कुणाला स्वार्था शिवाय फुटकी कवडी पंण देत नाही मात्र घरबांधायला मदत असुदेत किंवा उपचाराला मदत असुदेत निस्वार्थपणे केवळ माणुसकीचं नात जपणाऱ्या बाबुल सारख्याचं कार्य म्हणजे धर्मांध लोकांना चपराक आहे. आज बेळगावात बाबुल पठाण सारख्या आपल्या ऐपतीने का असेना मदत करून धार्मिक सौहार्द जपणाऱ्यांची गरज आहे.
आजचा समाज बरबटलाय जाती आणि धर्मभेदाने, अशा वातावरणातही हा बाबूल माणुसकीचा धर्म निभावतोय, त्याला बेळगाव live चा सलाम…
बाबुलचाचा पठाण –९००८२१०२७३