म्हादई नदीच्या पाणी वाटपा विरोधात राज्य रयत संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेला बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुके बंद उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून इतर तालुक्यात देखील देखील याचे पडसाद उमटले होते. बेळगाव शहरात मात्र याला अल्प प्रतिसाद मिळाला बुधवारी सकाळीच बंद घोषणा नसताना देखील शेतकरी नेत्यांनी बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करण्याचं आवाहन केलं मात्र त्याला प्रतिसाद नव्हता. बेळगाव सह उत्तर कर्नाटकातील चार जिल्ह्यात मात्र बंद बऱ्यापैकी यशस्वी झाला .
बुधवारी सकाळी चन्नमा चौकात शेतकऱ्यांनी निदर्शन केली रामदुर्ग सौन्दत्ती आणि बैलहोंगल मध्ये बंद कडक पाळण्यात आला होता.बेळगाव हुन हुबळी आणि कोल्हापूर महाराष्ट्रात जाण्याच्या बस बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांना याचा फटका बसला तर शहरातील बस सेवा बंद असल्याने स्थानिक लोकांना देखील याचा त्रास सहन करावा लागला.
बैलहोंगल मध्ये दगड फेक
आंदोलकांनी बैलहोंगल के व्ही जी बँक वर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या आहेत बँक बंद करा असं म्हणत सुरु असलेल्या बँकेच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली दुसरीकडे बैलहोंगल शहरात स्वयंप्रेरित दुकान बंद करण्यात आली होती.