कळसा भांडुरा पाणी वाटप वादा वरून शेतकऱ्यांनी बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यासह उत्तर कर्नाटक बंद पाळला आहे.केंद्र सरकारने हा पाणी तंटा सोडवावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हा बंद पुकारला आहे शेतकऱ्यांच्या अनेक संघटनांनी या बंद पाठिंबा दिला आहे
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग सौंदत्ती सह बैलहोंगल आणि बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीत बंद पुकारला आहे या तिन्ही तालुक्यातील शाळा कॉलेजन सुट्टी देखील देण्यात आली आहे . बंदच्या पाश्व भूमीवर विश्वेश्वरय्या विध्यापिथाची बी इ चा एक विषयाचा परीक्षेचा पेपर देखील रद्द करण्यात आला आहे..
बेळगाव देखील परिणाम
बेळगाव कडून हुबळी धारवाड कडे जाणाऱ्या बस बंद करण्यात आल्या असून याचा परिणाम बेळगाव मार्केट वर काही प्रमाणात झाला आहे .. याशिवाय बेळगाव हून महाराष्ट्र आणि गोव्याकडे जाणाऱ्या बस थांबवण्यात आल्या असल्याने याचा त्रास गोवा आणि महाराष्ट्र्कडे जाणाऱ्या प्रवाश्यांना होत आहे. सकाळी १० पर्यंत शहरातील बस सेवा देखील ठप्प असल्याने स्थानिक प्रव्श्याना देखील हाल सोसावे लागले