बेळगाव बस स्थानकाजवळ कार पार्क करून भाजी खरेदी करायला गेले असता कार चे ग्लास फोडून लुट केल्याची घटना उघडकीस आली आहे.मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गोवा येथील कुटुंब अथणी तालुक्यातील ऐनापूर येथे जाऊन गोव्याला परततेवेळी बेळगाव येथील सेन्ट्रल बस स्थानका जवळ कार पार्किंग करून भाजी खरेदी साठी गेले असता अज्ञातानी कार चे ग्लास फोडून कार मधील बॅग लंपास केली आहे. कारमधील पिशवीत ४० ग्राम सोने आणि अडीच हजार रोख रक्कम लंपास केली आहे.
या प्रकरणी गोवा येथील पुंडलिक जेवरे यांनी मार्केट पोलिसात तक्रार दाखल केली आहे.पार्किंग केलेल्या कारची ग्लास फोडून त्यातील रोख रक्कम दागिने लंपास करणारी गँग बेळगाव मध्ये सक्रीय झाली आहे त्यामुळे अज्ञात स्थळी वाहन पार्क करतेवेळी सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे.