वर्षभरापूर्वी एक मुलगा घरात फाशी घेतो, काल दुसरा मुलगा रेल्वेखाली जीव संपवतो आणि आज त्या कुटुंबाची आई आणि बहिणंही स्वतःला रेल्वेखाली झोकून देऊन जीवन संपवतात. एक संपूर्ण कुटुंबच आत्महत्येत संपून गेले आहे.
माणूस खचला की जीव देतो, एकामागून एक जर जीव देऊ लागले तर त्या कुटुंबाचे काय होणार? गणेशपुर येथील नवगवाणकर कुटुंबातील ही सलग आत्महत्या मालिका खळबळ माजवून गेली आहे.
शनिवारी सकाळी बेळगाव शहराच्या पहिल्या रेल्वे गेटजवळ एक तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. सकाळी आठ वाजता त्याचा मृतदेह सापडला होता. दुपारपर्यंत त्याची आई व बहिणीने त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली, तो संतोष शामसुंदर नवगवाणकर (वय ३५) असल्याचे उघड झाले होते.
पोलिसांनी मृतदेह देऊन सर्व सोपस्कार संपवले,
आणि रविवारी पुन्हा धक्का बसावा असा फोन रेल्वे पोलिसांना आला, गांधीनगर नजीक रेल्वे रुळावर दोन महिलांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी जाऊन पाहणी करता त्या दोघी काल आत्महत्या केलेल्या संतोष ची आई रुक्मिणी (वय ६०) आणि त्याचीच बहीण सरिता गणेश बुलबुले( वय ३०) असल्याचे लक्षात आले.
पोलिसांनाही या प्रकाराने धक्का बसला आहे. यापूर्वी फेब्रुवारी मध्ये याच कुटुंबातील सचिन या मुलाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
हे कुटूंब जीवनास कंटाळले होते. घरचा वेल्डिंग चा धंदा चालत नसल्याने घर चालणे अवघड होते. यातच या कुटुंबाने आत्महत्या केल्याचे बोलले जाते.