रस्त्यावरच आंदोलन करत बेळगाव सीमा प्रश्नी चौथी पिढी आजही सर्क्रीय आहे याच कौतुक आहे मात्र मराठीसाठी बेळगावातील मराठी जणास संघर्ष करावा लागतो याची खंत देखीळ महाराष्ट्रातील साहित्यिकांना आहे असे मत संत साहित्याचे अभ्यासक पुणे येथील साहित्यिक उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले.
रविवारी बेळगाव तालुक्यातील सांबरा येथे माय मराठी संघांच्या वतीने बाराव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थाना केल्यावर ते बोट होते.यावेळी साहित्यिका विजया वाड,ए पी एम सी अध्यक्ष निन्गाप्प जाधव, कॉंग्रेस नेते जयराज हलगेकर, नागेश देसाई,जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, भाजप नेते शिवाजी सुंठकर,मराठी भाषिक युव घडीचे भाऊ गडकरी सुनील अष्टेकर काशिनाथ धर्मोजी, आदि उपस्थित होते.
सुप्रीम कोर्टात मराठी भाषिकांना न्याय मिळोत संत तुकाराम ज्ञानेश्वरा कड प्रार्थना करू से देखी ते म्हणाले. मराठी भाषा जगात नवव्या नंबरची भाषा असून महाराष्ट्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवे. मातृभाषा शिकल्या शिवाय बुद्धाक वाढणार नाही मातृभाषेत आपली उंची वाढवायची असेल तर मातृभाषा आणि शिक्षणात प्रगल्भता आणायला हवी त्यामुळेच शैक्षणिक दर्जा देखील वाढतो.इंग्रजीचे सर्वांनाच फॅड निर्माण झाले आहे त्या फॅड ला देखील उकरून काढायला हवं असं देखील ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की आजच्या पिढीला संस्कृतीची माहिती नाही वारकरी संप्रदाय संताचे महत्व तुकाराम ज्ञानेश्वर नामदेव संत कबीर हे माहित नाही ही शोकांतिका आहे अभिनय हा वक्तृत्वाशिवाय यशस्वी होऊच शकत नाही वक्तृत्वासाठी क्षणोक्षणी साधना करायला हवी.
लक्षवेधी ग्रंथ दिंडी
मावळ्यांच्या रुपात सहभागी घोडेस्वार,संत गाडगेबाबा महाराजांच्या वेशभूषेतील व्यक्ती आणि वारकरी भजनांच्या गजरात काढण्यात आलेली ग्रंथ दिंडी देखील लक्षवेधी ठरली होती. तरुण मंडळाच्या कार्यालया पासून साहित्य नगर पर्यंत चाललेल्या ग्रंथदिंडी उद्घाटन ए पी एम सी अध्यक्ष निन्गाप्पा जाधव यांनी ग्रंथ पूजन साहित्यिका विजया वाड यांनी केल.
सीमा प्रश्नाचा ठराव
सीमा भागातील मराठी साहित्य संमेलनातून मराठी संस्कृती साहित्याचा जागर होत असतो अश्या सर्व साहित्य संमेलनांना महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत करावी. बेळगाव सीमा प्रश्न सर्वांच्या जिव्हाळ्याच्या न्यायप्रविष्ट आहे याची तड मराठीच्या बाजूने लागेल न्याय देवता न्याय देईल असा विश्वास आहे असे ठराव या संमेलनात मांडण्यात आले.
चार सत्रात संमेलन दुसऱ्या सत्रात मराठी चित्र सृष्टीतील जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची मुलाखात झाली तर कोल्हापूर येथील चंद्रकांत जोशी यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन देखील झाले. जेष्ठ साहित्यिका विजया वाड मुंबई याचं देखील व्याख्यान तर चौत्या सत्रात कथाकथन आणि नट सम्राट हा एकपात्री प्रयोग झाला.