बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड ने आपल्या ११ व्या प्रकल्पासाठी निविदा काढली आहे. शहरात मोकाटपणे फिरणाऱ्या भटक्या जनावरांसाठी हा प्रकल्प असून आशा जनावरांना तेथे निवारा देण्यात येईल.
या प्रकल्पाचा नियोजित खर्च ६४ लाख, २८ हजार ५८९ रुपये २९ पैसे इतका आहे. त्याचा कालावधीही ६ महिने इतकाच आहे. शहरातून अनेक जनावरे मोकाट फिरत असतात, गायी म्हैशी दूध देण्यास असमर्थ झाल्या की त्यांना असे रस्त्यावर सोडणारे अधिक आहेत.
त्या जनावरांमुळे रहदारीच्या समस्या आणि ट्राफिक जाम च्या घटना घडतात. हा प्रकल्प सुरू झाला तर त्या समस्या मिटू शकणार आहेत.