खडक गल्ली दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकातील दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस हेडकॉन्स्टेबल एस एम पाटील आणि कॉन्स्टेबल आय एस पाटील या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था डी सी पी सीमा लाटकर यांनी हा निलंबनाचा आदेश बजावला आहे.
या दंगली मागे कोण आहेत याचा छडा पोलिसांनी लावावा तसच केवळ दोन पोलिसांना बळीचा बकरा करण्या एवजी मुख्य सूत्रधाराना खऱ्या आरोपी गजाआड करा अशी मागणी केली जात आहे.