चव्हाट गल्लीत साडे चार इंच उत्तम डांबरी रस्ता असताना देखील खुदाई करून पेव्हर्स बसविण्याच्या कामाला गल्लीतील युवकांनी विरोध करून काम बंद पाडलं.शनिवारी सकाळी कोर्ट कंपाउंड च्या कडे जे सी।बी च्या सहाय्याने रस्ता खुदाई करण्यास सुरुवात केली त्यावेळी चव्हाट गल्लीतील युवकांनी विरोध करत काम बंद पाडले.कोर्ट कंपाऊंड मध्ये खड्डे आहेत तिथं पेव्हर्स बसवा असा सल्ला देखील गल्लीतील युवकांनी यावेळी दिला
पालिकेच्या 14 व्या फायनान्स मधून 23 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे पुंडलिक परिट यांच्या प्रयत्नातून हे काम सुरू करण्यात आलं होतं याला गल्लीतील लोकांनी विरोध केला.
पेव्हर्स बसवण्यासाठी खुदाई करण्यात आलेला रस्ता दोन दिवसात दुरुस्त करण्यात येणार आहे.