माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचा झंझावात सुरू झाला आहे. विध्यमान समिती आमदारावरील नाराजी आणि नव्या चेहऱ्याला संधी द्यावी या मागणीसाठी खानापुरात जोरदार क्रांती सुरू आहे.
भाजपची परिवर्तन रॅली तर काँग्रेस ची घरोघरी काँग्रेस अभियाना मुळे एकीकरण समितीत कोणत्याही प्रकारची जनजागृती नव्हती त्यामुळे समिती कार्यकर्त्यांनी दिगंम्बर पाटील यांच्या नेतृत्वात जनजागृती अभियान हाती घेतले आहे आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता प्रत्येक खानापूर तालुक्यातील प्रत्येक घरात पोचण्याचा मनोदय खानापुरातील नेत्यांनी केलाय.कुंणकुंबी माऊली गाऱ्हाणं घालून पहिल्या टप्याची सुरुवात चिगुळे,चोरला आदी भागात करण्यात आली. खानापूर येथील शिव स्मारकाच पूजन करून शनिवारी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
खानापूर तालुका म ए समिती नेत्यांना विश्वासात न घेता आमदार मनमानी करत आहेत. मराठी माणसाच्या हिताकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही, असा आरोप होत आहे. आशा वागणुकीने सामान्य जनता निराश होऊ नये म्हणून आता दिगंबर पाटील पुढे सरसावले आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला स्थान द्या अशी मागणी जोर धरत आहे. मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी यात कोणताही हस्तक्षेप करू नये, पहिल्यांदा बेळगाव शहर आणि तालुक्यातील गदारोळ पहिला संपवून घ्यावा मगच आमच्याकडे यावे, असे खानापूर तालुक्यातील जनता व नेते बोलत आहेत.
Jay maharastra