शहरात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर अटक झालेल्यांच सुटका करा अशी मागणी करत न्यायालय आवारात घोषणाबाजी केलेल्यावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. गेल्या सोमवारी रात्री दगडफेकीच्या घटने नंतर मंगळवारी पोलिसांनी एका गटाच्या २३ जणांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली होती त्यावेळी कोर्ट आवारात युवकाकडून घोषणाबाजी झाली होती.
मार्केट पोलिसांनी २३ जण आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेसाठी बेळगावातील कोर्ट आवारात आणले असता काही युवकाकडून युवकांची सुटका करा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली होती यास आक्षेप घेत बेळगाव बार असोसिएशन च्या वतीने जिल्हा सत्र न्यायाधीशां कडे तक्रार देखील केली होती. सत्र न्यायाधीश सतीश सिंह यांनी यांची दखल घेत पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांना कारवाई करा अशी सूचना देण्याचे आश्वासन दिले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या युवकांची यादी बनवली असून त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची तयारी प्रशासनाने चालवली आहे.
पोलिसांनी एकदा गुन्हा दाखल केल्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरु असते आंदोलन किवा सुटका करण्याची मागणी केवळ पोलीस स्थानका पर्यंतच होऊ शकते त्यामुळे न्यायालयीन आवारात घोषणा बाजी झालेली बहुदा बेळगावातील पाहिच घटना आहे यापुढे कोणीही असे प्रकार करू नयेत म्हणून पोलीस कारवाईच्या विचारात आहेत अशी देखील माहिती मिळाली आहे.