बेळगावात होत असलेल्या जातीय दंगलीच्या पाश्वभूमीवर बेळगावात बंदीबस्ता साठी रॅपिड ऍक्शन फोर्स दाखल झाली आहे.शहरातील तणाव निवळण्यासाठी खास तमिळनाडू हुन आर ए एफ दोन तुकड्या मागवण्यात आल्या आहेत त्या संवेदनशील भागात तैनात करण्यात येणार आहेत.
शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालया पासून या आर ए एफ तुकड्या पथसंचलन करत चव्हाट गल्ली टोपी गल्ली भडकल गल्ली जालगार गल्ली खडक गल्ली,कचेरीरोड खंजर गल्ली खडे बाजार दरबार गल्ली पुन्हा चव्हाट गल्लीमार्गे जिल्हाधिकारी कार्यलया पर्यंत पथ संचलन केलं.
डी सी पी अमरनाथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हे पथ संचलन करण्यात आलं.यावेळी अनेक स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी देखील सहभाग घेतला होता.