“बेळगाव live” प्रस्तुत ” २०१७ चा सेवाभावी बेळगावकर ” हा मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे. साहजिकच पत्रकारिता, सामाजिक सेवा, उल्लेखनीय डॉक्टरी सेवा, सेवाभावी वकील, समाजप्रबोधनपर लेखक, उत्कृष्ट कविता निर्मक , उल्लेखनीय पोलीस अधिकारी, उल्लेखनीय प्रशासकीय अधिकारी ,लढाऊ महिला कार्यकर्ती, उल्लेखनीय खेळाडू(मुलगी), उल्लेखनीय खेळाडू (मुलगा) आणि उत्कृष्ट लोकप्रतिनिधी अशा बारा वेगवेगळ्या गटातील बारा व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार देऊन ” बेळगाव live” तर्फे सन्मानित केले जाणार आहे.
२०१७ च्या २७ फेब्रुवारीला “बेळगाव live” या प्रत्येकाचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ असलेल्या न्युज पोर्टल चा जन्म झाला. अवघ्या दहा महिन्यात हे पोर्टल सुप्रसिद्ध बनले. बेळगावातील जनताच नव्हे तर देश आणि विदेशात पसरलेले बेळगावकर तसेच बेळगाववर लक्ष असणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या प्रत्येकानेच ” बेळगाव live” वर भरभरून प्रेम केले. पोर्टलचे फेसबुक पेज ३० हजार फॉलोवर्स च्या उंबरठ्यावर आहे आणि प्रत्येक बातमीला १० ते १५ हजार हिट्स हे अल्पकाळात मिळवलेले यशच म्हणता येईल.
२७ फेब्रुवारी हा ” बेळगाव live” चा पहिला वर्धापन दिन. या निमित्ताने हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार जनतेच्या मनातील जागा व्यापलेल्या त्या बारा व्यक्तींना.
या वेगवेगळ्या क्षेत्रातील नावे म्हणजेच पर्याय आम्ही घोषित करू. त्यांना मते देऊन निवडायचे आहे तुम्ही म्हणजेच मायबाप जनतेने. आपल्या मतांच्या जोरावर. लवकरच आम्ही आमचे पर्याय घोषित करू आणि तुम्ही ज्यांना सर्वाधिक मते द्याल त्यांनाच निवडू ” २०१७ चा सेवाभावी बेळगावकर ” या पुरस्कारासाठी.
लक्ष ठेऊन राहा नावाच्या पर्यायाकडे आणि मते घाला १० फेब्रुवारी पर्यंत.