खडक गल्ली दगडफेक जाळपोळ प्रकरणी खडे बाजार पोलिसांनी आणखी सात जणांना अटक केली आहे.आजच्या अटके नंतर खडे बाजार पोलिसांनी एकूण संख्या 13 वर पोचली आहे.
प्रशांत अर्जुन पाटील वय 23 रा. रामनगर कंग्राळी
मनोज राऊत वय 26 बापट गल्ली
संपत शिंदे वय 23 कंग्राळ गल्ली
गणेश बिलावर वय 46 कंग्राळ गल्ली
विजय देमानाचे वय 40 किल्ला
शिवराज मोहिते वय 27 केळकर बाग
अभिजित पाटील वय 18 गाडे मार्ग शहापूर अश्या सात जणांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी आय पी सी कलम १४३,१४७, १४८, १५३अ, ५०४ , ५०६ अन्वये दोन धर्मियात तेढ निर्माण करणे,सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणे गटाने मारामारी करणे असे गुन्हे नोंदवले आहेत.
कंग्राळ गल्ली आणि गणाचारी गल्लीतील रणरागिणी एकवटल्या
वरील परिसरातील निष्पाप तरुणांना अटक केल्याचा आरोप पोलीस प्रशासनावर करून खडेबाजार पोलीस स्थानक समोर रणरागिणी एकवटल्या होत्या.
महापौर संज्योत बांदेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्गाशी बातचीत केली. अजून हा प्रश्न मिटलेला नाही.