तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा लढ्यात योगदान दिलेल्या बेळगुंदी भागातील सीमा सत्याग्रहींचा सत्कार गुरुवारी करण्यात आला.रविकिरण संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
सातत्यानं 60 वर्षे लोकशाही मार्गातून चाललेला हा जगाच्या पाठीवरील एकमेव लढा असून युवकांनी लढा हाती घ्यावा असे आवाहन तालुका समिती सरचिटणीस मनोज पावशे यांनी केलं.
यावेळी ए पी एम सी अध्यक्ष निंगपप्पा चौगुले, तालुका समितीचे कार्याध्यक्ष वाय बी चौगुले,शिवाजी शिंदे,यल्लप्पा बेळगावकर,अशोक पाटील,पिराजी मुचंडीकर आदी उपस्थित होते.
कृष्णा पाऊसकर(बेळगुंदी) नारायण झंगरुचे,बाळू कडोलकर,परशराम पाटील( सर्व सोनोली),मिनाजीओऊळकर(कावळेवाडी)देवाप्पा अष्टेकर,आणणू पाटील,लक्ष्मण हरिजन(बिजगरणी)ईश्वर बीजगणिकर (बोकनूर)दादा पाटील तुकाराम बोंगाळे (सुरुते)रामा शिंदोळकर आदींचा सीमा आंदोलना तील योगदाना बद्दल सत्कार करण्यात आला.