कर्नाटकात आगामी विधान सभेत मोदी मॅजिक चालणार नसून पुन्हा काँग्रेस पक्षच सत्तेवर येईल असं ठाम विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे . गोकाक विधान सभा मतदार संघातील १२० कोटींच्या विविध विकास कामांचं उदघाटन केल्यावर गोकाक येथील जाहीर सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि रमेश जारकीहोळी यांना जिल्ह्यातील एकूण १८ पैकी १४ जागा निवडून आणा असं सांगितलंय त्यांनी ते मान्य केलंय बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस शक्तिशाली झालं आहे.
पाच वर्षात काँग्रेस ने राज्यात बहारपूर कामे केली आहेत मोदी अमित शाह ची नजर कर्नाटकावर आहे .भाजपच्या आमदाराने आम्ही मोदी वर अवलंबून आहे असं सांगितलंय मोदींच वर्चस्व मोदी मॅजिक कर्नाटकात चालणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं . जाती जातीत भांडण लावणे, खून करणे अश्या वर भाजप राजकारण करत आहे असा आरोप देखील त्यांनी केला .
भाषण थांबवून मोदींना केलं फॉलो
गोकाक मधील सभेत भाषणा दरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुस्लिम समाजाच्या प्रार्थनेचा( आझान) आवाज येताच भाषण थांबवल होते. गुजरात निवडणुकीत पंत प्रधान मोदी यांनी देखील अझान सुरु असताना भाषण थांबवल होत त्याच पद्धतीचा अवलंब करत सिद्धरामय्या देखील थोडा वेळ थांबवून पुन्हा भाषणास सुरुवात केली .
या कार्यक्रमास पालकमंत्री रमेश जारकीहोळी, मंत्री एम बी पाटील , जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे ,जिल्हाधिकारी एस जिया उल्ला जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी रामचंद्र राव आदी उपस्थित होते .