राज्य सरकारने महा पालिकेस दिलेल्या १०० कोटी अनुदानातून दक्षिण मतदार संघातल्या विविध विकास कामांना सुरुवात करण्यात आली. आमदार संभाजी पाटील पूजन करून या विविध विकास कामांना सुरुवात केली.
यावेळी उपमहापौर नागेश मंडोळकर,माजी महापौर किरण सायनाक,सरिता पाटील,महेश नाईक गटनेते पंढरी परब पालिका आयुक्त शशिधर कुरेर,अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर,नगरसेवक विनायक गुंजटकर, अनंत देशपांडे मेघा हळदणकर,रमेश सोंटक्की,राजू बिर्जे,अनिल मुचंडीकर आदी उपस्थित होते.
खालील कामांना चालना देण्यात आली आहे
प्रभाग २ – महावीर नगर ते पिरनवाडी नाल्याचे आर सी सी करण – निधी ७५ लाख
प्रभाग ६ –शिवशक्ती नगर कनकदास नगर रस्ते दुरुस्ती – ९४ लाख
प्रभाग ८ –भाग्यनगर तिसरा क्रॉस ३० फुट रस्ता दुरुस्ती, बुडा ८ स्कीम जवळ – ३७ लाख
प्रभाग ९ –आदर्शनगर,नाझर कॅम्प,रामदेव गल्ली वाडा वडगाव रस्ता – ७५ लाख
प्रभाग १७- टिळकवाडी नेहरू नगर रॉय रोड रस्ते दुरुस्ती- ६५ लाख
प्रभाग २६ – न्यू गुडसशेड रोड रस्ता दुरुस्ती – ६९ लाख
प्रभाग २६ –कपिलेश्वर मंदिर ते रेणुका हॉटेल सिमेंट कॉन्क्रेट रोड
एस पी एम मेन रोड ते ओल्ड पी बी रोड – ८५ लाख
या शिवाय टिळकवाडी येथील लेले मैदान उद्यान आणि हिंदवाडी येथील उद्यान उद्घाटन करण्यात आले